ब्रिज एकच, उद्घाटन तीनदा, काल मनसे, आज शिवसेना, उद्या भाजप!
पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती असंख्यवेळा पुणेकरांनी खरी करुन दाखवलीय. त्यामुळे आता नव्याने पुण्यात काही कुतुहलजनक घडले, तरी त्यात नाविन्यता काहीच राहत नाही. तरी पुण्यातल्या राजकारणाच्या बाबतीत ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती फार क्वचित दिसून येते. मात्र, सध्याचा प्रसंग या उक्तीला साजेसाच आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं […]
पुणे : ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती असंख्यवेळा पुणेकरांनी खरी करुन दाखवलीय. त्यामुळे आता नव्याने पुण्यात काही कुतुहलजनक घडले, तरी त्यात नाविन्यता काहीच राहत नाही. तरी पुण्यातल्या राजकारणाच्या बाबतीत ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती फार क्वचित दिसून येते. मात्र, सध्याचा प्रसंग या उक्तीला साजेसाच आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं तीन वेगवेगळ्या पक्षांनी तीन वेगवेगळ्या दिवशी तीनवेळा उद्घाटन केलं. मनसे, शिवेसना आणि भाजप यांच्यातील या श्रेयवादाची चर्चा पुण्यासह आता महाराष्ट्रभर रंगते आहे.
पुणे शहरातून कोंढाव्याला जात असताना लुल्लानगर चौकातील उड्डाणपूल गेले अनेक दिवस कागदोपत्री अडकला होता. लष्कराच्या परवानग्या घेऊन लुल्लानगर चौकातील उड्डाणपूल काम पूर्ण होऊन एक महिना होत आले तरी तो सुरु नव्हता. मात्र आचारसंहिता संपताच उद्घाटन कोणी करायचे याच राजकारण सुरु झालं.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने राजकीय कार्यक्रमावर बंदी असते. मात्र आचारसंहिता संपताच कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकातील उड्डाणपूलाच उद्घाटन कोणी करायचं यावरुन स्थनिक मनसे नगरसेवक आणि भाजप आमदार यांच्यात वाद सुरु झाला आहे. मात्र मनसेने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सामान्य वाहन चालकाच्या हस्ते उद्घाटन करुन उड्डाणपूल वाहतुकीला खुला केला आहे. यावर मनसे नगरसेवकांनी आमदारावर टीका करत खर्च महापालिकेने केला, यात आमदारांचा काय संबध, असे म्हणत उद्घाटन केले.
कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकात मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा उड्डाणपूल सुरु झाला तर मोठी वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे. मात्र उद्घाटन कोणी करायचे या यावरुन मनसे आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. भाजपने 2 जूनला पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन ठेवले. तर उद्घाटन राजकारण्याशिवाय करत मनसेने मनसे स्टाईलने आंदोलन करत सामान्य नागरिकाच्या हस्ते उड्डाणपूल उद्घाटन करत नागरिकांसाठी पूल खुला केलाय.
विशेष म्हणजे, आज भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही याच उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं आहे. त्यामुळे काल मनसे, आज शिवसेना आणि उद्या भाजप उद्घाटन करणार आहे.
भाजपने हा पूल करण्यासाठी 2009 पासून प्रयत्न करत आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रम आहे तो असा कोणी करू शकत नाही. मी यासाठी खूप पाठपुरावा केला आहे मनसे काम पूर्ण नसताना श्रेय घेत आहेत विकासकामात राजकारण करू नका, असे आमदार योगेश टिळेकर म्हणाले.
हडपसरमध्ये अनेक दिवसापासून वाहतूक कोंडी असलेला लुल्लानगर चौक आता हा उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहतूक मुक्त होणार आहे. 2015 साली सुरु झालेला आणि 15 कोटी खर्च करून नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या पुलाचे राजकीय प्रतिष्ठेसाठी आता दोनवेळा उद्घाटन होणार असून नेमकं श्रेय का आणि कोण घेत आहे असा प्रश्न विचाराला जातोय.