अंबानींच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याकडून सुपारी, मनसेचा ‘स्फोटक’ आरोप
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन सापडणं, हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले. (Avinash Jadhav Minister Helipad Ambani)
वसई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मनसेने उडी घेतली आहे. अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी बड्या मंत्र्याने सुपारी घेऊन रचलेला हा कट आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत केला. (MNS Avinash Jadhav claims Maharashtra Minister planned for Helipad Permission at Mukesh Ambani residence Antilia)
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून, की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा तपास होणे गरजेचे आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे. हा हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोपच अविनाश जाधव यांनी केला.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचे मशीन सापडणं, हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले. हे सर्व प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आले आहे. सध्या या प्रकरणाचा NIA व्यवस्थित तपास करत आहे. अवघ्या 2 ते 3 दिवसात मोठी पत्रकार परिषद होणार असून यात राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही NIA कडे?
दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) काढून राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या एनआयए केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर दहशतवादविरोधी पथक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा तपास करत आहे.
सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून एनआयएच्या तपासाने वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या तिन्ही प्रकरणांच्या केंद्रस्थानी सचिन वाझे हेच आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास एनआयएकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
डॅशिंग अधिकारी शिवदीप लांडे ATS कार्यालयात, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महत्त्वाची चर्चा
ठाकरे सरकार मनसेला घाबरते; भाजपच्या मोर्चाला परवानगी, आम्हाला का नाही? : अविनाश जाधव
(MNS Avinash Jadhav claims Maharashtra Minister planned for Helipad Permission at Mukesh Ambani residence Antilia)