राज ठाकरेंना ED नोटीस, मनसे एक्स्प्रेस वे रोखणार, ठाणे बंदचाही इशारा

ईडीने राज ठाकरे यांना ज्या दिवशी चौकशीला बोलावलं आहे, त्या दिवशी म्हणजेच 22 ऑगस्टला ठाणे बंदचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरेंना ED नोटीस, मनसे एक्स्प्रेस वे रोखणार, ठाणे बंदचाही इशारा
Follow us
| Updated on: Aug 19, 2019 | 5:38 PM

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने बजावण्यात आलेल्या समन्सवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ईडीने राज ठाकरे यांना ज्या दिवशी चौकशीला बोलावलं आहे, त्या दिवशी म्हणजेच 22 ऑगस्टला ठाणे बंदचं (Thane) आवाहन केलं आहे. मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी हे बंदचं आवाहन केलं आहे.

याशिवाय पुण्यातील मावळमध्येही मोठ्या प्रमाणत आंदोलन छेडले जाईल. 22 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग अर्थात मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर आंदोलन करु, असा इशारा  मनसेच्या मावळच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

दुसरीकडे प्रेमाने बंद केलं तर स्वागत, नाहीतर कार्यकर्त्यांच्या रोषाला समोर जावं लागेल, असा धमकीवजा इशारा  मनसेचे ठाणे,पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.  महाराष्ट्रात त्या दिवशी जे घडेल त्याला सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल, असंही अविनाश जाधव म्हणाले.

हे प्रकरण ईडीचं नाही, तर ईव्हीएमचं आहे. 15 वर्षांनी सरकारला कोहिनूर प्रकरण आठवलं का? विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंनी ईव्हीएमविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे घाबरुन आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस म्हणजे ईव्हीएमला विरोध केल्याचा राग आहे. ईडीने जर 22 ऑगस्टला चौकशीला बोलावलं तर ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी काल राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती. याप्रकरणी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत 22 ऑगस्टला ठाणे बंदचे आवाहन केले.

काय आहे प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.

या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.

आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.

वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट – किणी ते कोहिनूर : 23 वर्षात राज ठाकरेंची कोणकोणती चौकशी?  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.