Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे कोर्टात, मनसेच्या वकिलांची तगडी फौज सोबत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयात हजर होण्यासाठी निघाले आहेत. MNS Chief Raj Thackeray going to present in vashi Court Toll Plaza case

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे कोर्टात, मनसेच्या वकिलांची तगडी फौज सोबत
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 12:44 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयात हजर झाले आहेत. राज ठाकरे कृष्णकुंज निवासस्थानावरुन सकाळी अकरा वाजता निघाले. राज ठाकरे यांच्यासोबत वकिलांची फौज देखील आहे. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास राज ठाकरेंचा ताफा कृष्णकुंज निवासस्थानावरुन रवाना झाला. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.(MNS Chief Raj Thackeray going to present in Vashi Court in Toll Plaza case)

राज ठाकरेंसोबत वकिलांची फौज

राज ठाकरे वाशी कोर्टाच्या दिशेने निघालेले आहेत. 2014 मध्ये वाशी टोलनाक्यावर तोडफोड झाली होती. राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंना वॉरंट काढलं गेलं. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित आहेत. राज ठाकरेंना वॉरंट काढल्यानं मनसेचे कार्यकर्ते वाशी टोलनाका परिसरात जमा झाले आहेत. (MNS Chief Raj Thackeray going to present in Vashi Court in Toll Plaza case)

राज ठाकरेंचे वकील काय म्हणतात?

मनसे प्रमुख राज ठाकरेंना जानेवारी महिन्यात वॉरंट बजावण्यात आलं होतं. मनसेच्या विधी व न्याय विभागाची फौज वाशी न्यायालय परिसरात दाखल झाले आहे. राज ठाकरेंना जामीन मंजूर होईल, अशी आशा अ‌ॅड. रविंद्र पाष्टे यांनी सांगितलं. मनसेच्या विधी विभागाचे वकील मोठ्या संख्येने वाशी न्यायालय परिसरात उपस्थित आहेत.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर टोलनाक्याची तोडफोड

26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

raj thakrey car

राज ठाकरे वाशीकडे रवाना

मनसैनिकांकडून ग्रँड वेलकम

राज ठाकरे येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचं ठरवलं आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटते.

संबंधित बातम्या: 

Video: टीम इंडियाला झोडपणाऱ्या रुटच्या मदतीला जेव्हा विराट धावला

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे कोर्टात हजर राहणार

(MNS Chief Raj Thackeray going to present in Vashi Court in Toll Plaza case)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.