बापरे! माहिमच्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न? राज ठाकरे यांनी थेट पुरावाच दाखवला

माहिमच्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

बापरे! माहिमच्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न? राज ठाकरे यांनी थेट पुरावाच दाखवला
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 9:39 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या सभेत स्क्रिनवर माहीमची एक जागा दाखवली. या व्हिडीओत माहीममध्ये भर समुद्रात दर्गा बांधला जात असल्याचं त्यांनी निदर्शनास आणनू दिलं. तसेच समुद्रातील हे संबंधित अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर आम्ही त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारु, असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना संबंधित बांधकाम हटवावं नाहीतर आपण त्याच्या बाजूला गणपतीचं मोठं मंदिर उभारु, असा इशाराच दिला.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रशासनाचं दुर्लक्ष असलं ना राज्यकर्त्याचंं दुर्लक्ष असलं तर काय घडू शकतं, कारण सगळ्याचंं राजकारणाकडे लक्ष, पण गेल्या दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेली गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला सांगायची आणि दाखवायची आहे. मी मध्यंतरी असाच या भागात एकाकडे गेलो होतो. समोर पाहिलं तर मला समुद्रात लोकं दिसली. काय ते समजेना. मी एकाला सांगितलं की बघ रे काय ते. मग त्या माणसाने ड्रोन शूट करुन माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या.

प्रशानाचं दुर्लक्ष असल्यावर काय घडू शकतं, या गोष्टीचे गैरफायदे कशाप्रकारे घेतले जातात, तुमचं लक्ष असलं पाहिजे कोणत्या गोष्टी होतायत, जो घटना मानणारा मुसलमान यांना विचारणार आहे जे मी दाखवणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का. मी हे दाखवण्याआधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, मुंबई मनपाचे आयुक्त, मुंबई पोलीस खात्याचे कमिश्नर विवेक फणसाळकर माझी सगळ्यांना विनंती आहे की, यावर जर समजा तुमची कारवाई होणार नसेल त्यानंतर महिनाभरानंतर काय होईल ते पाहिल्यावर मी सांगेल. हे माहीम आहे.

हे इतिहासकारण दर्गा. त्याचा पुढे अनधिकृतपणे समुद्रात उभं केलं. माहिम पोलीस स्टेशन जवळ आहे. लक्ष नाही. महापालिकाचे लोकं उभे असतात. पण पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजीअली तयार करणार? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिश्नर, महापालिका आयुक्तांना आजच सांगतो महिन्याभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाहीत. वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. एकदा माझ्याकडे राज्य आलं तर आख्खं राज्य सुतासारखं सरळ करेन. परत कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही.

तुमची ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. खरंतर गरज नाही. पण दाखवावी लागणार. मुसलमान समाजाला हे मान्य आहे का? कुणाची समाधी आहे ती, माशाची? हे दाखवण्यासाठी हा स्क्रिन लावला होता.

येणारी राम नवमी जोरात साजरी करा. येत्या ६ जूनला आपल्या शिवछत्रपतींच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. मी स्वत: रायगडावर जा. दक्ष राहा, बेसावध राहू नका. आजूबाजूला काय घडतंय यावर पाळत ठेवा. आज बेसावध राहिलं तर पायाखालची सगळी जमीन चालली जाईल ते कळणार नाही. दक्ष राहा. शासनावर अंकूश ठेवा.

मी एप्रिलमध्ये माझ्या कोकणातील सभा घेणार आहे. मी त्यांच्या मागे जात नाहीय. पण आधी जाहीर झालेल्या सभांना जाईन. सगळ्यांचे आभार मानतो. महिलांना वाट मोकळी करुन जावं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.