ओवेसींना कानाखालचा रंग बदलणं महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल : अविनाश जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएमआयएम) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे (Avinash Jadhav on Asaduddin Owaisi).
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएमआयएम) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे (Avinash Jadhav on Asaduddin Owaisi). आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी असदुद्दीन ओवेसींवर हल्ला चढवला आहे. रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवेसींना महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल, असं म्हणत जाधव यांनी ओवेसींवर बोचरी टीका केली (Avinash Jadhav on Asaduddin Owaisi).
अविनाश जाधव म्हणाले, ओवेसींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, तर त्यांना स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला प्रसिद्धी मिळते. त्याचा भाग म्हणून ते राज ठाकरेंवर टीका करत असावेत. रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल. यांच्या पुढे पुन्हा ओवेसींनी राज ठाकरेंवर टीका केली, तर महाराष्ट्रात त्यांच्या पतंगीची कन्नी मनसैनिकच कापेल एवढं नक्की.”
राज ठाकरे यांनी केलेली भाषणे ओवेसी यांनी बघावं. त्यांनी अब्दुल कलाम, जहीर खान असे महाराष्ट्रातील प्रत्येक मुस्लीम माणूस आमचा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, ओवेसींसारखी माणसं दंगली घडवण्याचं काम करतात, असाही आरोप अविनाश जाधव यांनी केला.
व्हिडीओ :