Bala Nandgaonkar: मंदिरात CCTV, पण मस्जिदीत आहेत का? बाळा नांदगावकरांचा सवाल आणि त्यावरची उत्तरं…
MNS Leader Bala Nandgaonkar: मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी याबाबत एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का?, असा प्रश्न उपस्थित केलाय.
मुंबई : एकीकडे मनसेनं (Maharashtra Navnirman Sena) मशिदींच्या भोंग्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच आता त्यात आणखी एका मुद्द्याची भर पडणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर (MNS Leader Bala Nandgaonkar) यांनी याबाबत एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का?, असा सवाल आता मनसे नेते बाळा नांदगावर यांनी उपस्थित केला आहे. सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात (Religious places) CCTV यंत्रणा का करू नये?, असंदेखील त्यांनी म्हटलंय. हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अस आवाहनही करण्यात आलं आहे.
नेमकं बाळा नांदगावकर यांनी काय म्हटलं?
बुधवारी मनसे नेते बाळनांदगावकर यांनी ट्वीट करत म्हटलंय, की…
जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये? हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
बाळा नांदगावकरांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण बहुतांश मशिदींच्या आवारात हे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत, असंही सांगितलं जातं. काही मशिदींच्या आतील आवारात सीसीटीव्ही बसवले नसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र मोठ्या मशिदींमध्ये सीसीटीव्ही हे सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बसवण्यात आलेले आहेत, असंही सांगितलं जातंय.
मुद्दा महत्त्वाचाच..
दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणं, ही बाब स्वागतार्ह आहेच. मात्र त्यासाठी थेट मशिदींना निशाणा बनवणं कितपत योग्य, असाही प्रश्न उपस्थित होतोय. राज्यासह देशातील अनेक मशिदींच्या आवारात सीसीटीव्ही खरोखरच आहेत की नाही, याचीही पडताळणी आता यानिमित्त केली जाईल. शिवाय प्रार्थनास्थळी असणाऱ्या सीसीटीव्हींचा मुद्दाही चर्चेत आला, तर नवल वाटायला नको.
भोंग्यावरुन आक्रमक
दुसरीकडे भोंग्यावरुन आक्रमक पवित्रा घेतलेल्या राज ठाकरेंची औरंगाबादेतही सभा आयोजित करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये सभा घेण्याची घोषणा केली. यासाठी औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी उत्साहाने कामालाही लागलेत. शहरातील खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलतात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.
बाळा नांदगावकरांचं ट्वीट..
जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? “सर्वधर्मीय” प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 19, 2022