MNS Gajanan Kale | अंबादास दानवे बारामतीचा पोपट, राष्ट्रवादीची तळी उचलतात, मनसे नेते गजानन काळेंची जहरी टीका

अंबादास दानवेंवर टीका करताना गजानन काळे म्हणाले, ' मुळातच हिंदुत्वाचच्या असली नकलीच्या गप्पा मारायच्या. अंबादास दानवे विधान परिषदेवरून औरंगाबादमधून निवडून गेले. ते औरंगजेबाची औलाद ओवैसीच्या एमआयएमच्या नगरसेवकाच्या जीवावर निवडून येतात.

MNS Gajanan Kale | अंबादास दानवे बारामतीचा पोपट,  राष्ट्रवादीची तळी उचलतात, मनसे नेते गजानन काळेंची जहरी टीका
गजानन काळे, अंबादास दानवे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:26 AM

मुंबईः राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वक्तव्यांवर कडाडून टीका करणाऱ्या शिवसेना नेते अंबादास दानवेंवर मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी जहरी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विधान परिषदेवर निवडून आले, तेदेखील औरंगजेबाची औलाद ओवैसीच्या नगरसेवकांच्या जीवावर… लॉटरीत त्यांना विरोधी पक्ष नेते पद मिळालं, अशीही टीका गजानन काळे यांनी केली आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंनी भाजपची स्क्रिप्ट वाचल्याचा आरोप केला. मात्र दानवे हेच बारामतीचे पोपट आहे, असा टोला गजानन काळे यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसची तळी उचलल्यामुळेच तुमचा पक्ष संपलाय, असे बोलही काळे यांनी सुनावले.

गजानन काळे यांची टीका काय?

अंबादास दानवेंवर टीका करताना गजानन काळे म्हणाले, ‘ मुळातच हिंदुत्वाचच्या असली नकलीच्या गप्पा मारायच्या. अंबादास दानवे विधान परिषदेवरून औरंगाबादमधून निवडून गेले. ते औरंगजेबाची औलाद ओवैसीच्या एमआयएमच्या नगरसेवकाच्या जीवावर निवडून येतात. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तळी उचलून स्वतःचा पक्ष संपूर्णपणे संपवलाय. याची आठवण मला अंबादास दानवेंना करून द्यावी वाटते. लॉटरीमध्ये विरोधीपक्ष नेते पद मिळाल्याने काहीही बरळू नका, अशी विनंती मी करतो. बारामतीचा पोपट अशा पद्धतीने विरोधी पक्षनेता म्हणून बोलायला लागला तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की.

अंबादास दानवेंचं वक्तव्य काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिंदे गट आणि भाजपवर चौफेर टीका केली. शिवसेनेकडे विचार नाही, म्हणून पक्षाची ही अवस्था झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली. याला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपाची तळी उचलण्याचं काम करत आहेत. भाजप ज्या प्रमाणे स्क्रिप्ट लिहून देतात, त्याच प्रमाणे राज ठाकरे भाषणात बोलत असतात. ईडीच्या नोटीशीनंतर त्यांच्या भूमिकेत कमालीचा बदल झालाय, अशी थेट टीकाही दानवे यांनी काल केली.

शिंदेसेना-शिवसेना-भाजपात मनसेची एंट्री

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदेसेना-भाजप विरोधात शिवसेना असा सामना रंगणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात आता मनसेनेही दमदार एंट्री केल्याचं दिसून आलंय. मंगळवारी राज ठाकरे यांनी राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यात शिंदे-शिवसेनेवर सडकून टीका केली. तसेच मनसेची भूमिका घरा-घरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका मांडली. आगामी निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर लढणार का, याचे उत्तर काही दिवसातच मिळेल, असेही म्हटले जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.