परमबीर सिंगची बदली का केली, चौकशी का केली नाही? राज ठाकरेंचा सवाल

या प्रकरणानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.  (Raj Thackeray on Parambir Singh Letter)

परमबीर सिंगची बदली का केली, चौकशी का केली नाही? राज ठाकरेंचा सवाल
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 12:13 PM

मुंबई : “परमबीर सिंग यांना पदावरून का बदलण्यात आलं. ते त्यात ते गुंतलेले होते का? ते गुंतलेले होते असं वाटतं तर त्यांची बदली का केली, चौकशी का केली नाही?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला आहे.  गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी शनिवारी (20 मार्च) केला. या दाव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. (Raj Thackeray on Parambir Singh Letter Anil deshmukh)

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

“मला जे आता बोलायचे ते बोलून झाल्यावर मी कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही. ते माझ्या निवेदनात असेल. का देऊ शकणार नाही किंवा का इच्छा नाही हे पण निवेदनात असेल. कारण प्रश्न विचारल्यावर अनेक विषय निघतात आणि मूळ विषय निघून जातो. त्यामुळे इतर विषयांना मी हात घालणार नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

“गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला 100 कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे.’ जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 100 कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे,” अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

“ही घटना लज्जास्पद आहे. अशी घटना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडली नाही. एक वर्षे झाले म्हणून १२०० कोटी द्यायला हवी असेल. पण लॉकडाऊनमुळे बार बंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल. राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिला हे अजून बाहेर आलं नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे,” असेही राज ठाकरेंनी सांगितले.

जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं?

“बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकलं होतं, पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं किंवा पाहिलं नव्हतं. मुळात परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली?  मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली?” असेही राज ठाकरे म्हणाले.

“त्यांच्या घराबाहेर बॉम्बची सापडते आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ह्याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा,” अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

“केंद्राने सखोल चौकशी करायला हवी” 

“सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील,” असेही राज ठाकरे म्हणाले  (Raj Thackeray on Parambir Singh Letter Anil deshmukh)

राज्यात निष्पक्ष तपास होईल याची खात्री नाही

“जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं,” असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

“माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. कारण या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली, तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल. आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ,” असेही राज ठाकरे म्हणाले.

चौकशी व्यवस्थित होऊ द्या

“सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या,” असेही राज ठाकरेंनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

‘लेटरबॉम्ब’प्रकरणाचा केंद्राने तपास करावा, केंद्राने तपास केल्यास फटाक्याची माळ लागेल; राज ठाकरेंचा दावा

अमृता फडणवीसांचं ट्विट; उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या शब्दांत टीका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.