“कुठल्याही निवडणुका लागल्या तरी मला बोलवा, आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायचीय, जिंकायचीय”, अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

कुठल्याही निवडणुका लागल्या तरी मला बोलवा, आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायचीय, जिंकायचीय, अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन
Amit Thackeray
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:17 AM

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) बरेच बदल होत आहे. तरुणपिढी राजकारणात सक्रीय होत आहे. मनसे नेते अमित ठाकरेदेखील (Amit Thackeray) सध्या दौरा करत आहेत आणि मनसैनिकांशी संवाद साधत आहेत. तसंच सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जान भरण्याचं, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अश्यातच त्यांनी आगामी निवडणुकांविषयी भाष्य केलंय. “येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

“येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहचवू. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. येत्या प्रत्येक निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अमित ठाकरे आजपासून चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यात ते नाशिक शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर टीका

अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे, असं अमित ठाकरे म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

तेजस ठाकरे ठाकरे राजकारणात सक्रीय होत आहेत, अश्या चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंनी भाष्य केलंय. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं अमित ठाकरे म्हणालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.