‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना सॉल्लिड प्रत्युत्तर

राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. | Sanjay Raut

'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना सॉल्लिड प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 4:25 PM

मुंबई: राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे वक्तव्य करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाकून कोपरापासून दंडवत घालताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’, अशी चपखल कॅप्शन संदीप देशपांडे यांनी फोटोच्यावरती लिहली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, हे पाहावे लागेल. ( MNS leader Sandeep Deshpande taunts Shivsena MP Sanjay Raut)

मे महिन्यात महाराष्ट्र कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीवरून महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यावेळी संजय राऊत यांनी राजभवन म्हणजे फालतू राजकारणाचा अड्डा झाल्याची टीका केली होती. या टीकेमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रचंड दुखावले गेले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा संजय राऊत यांनी राज्यपालांना कोपरापासून दंडवत केला होता. भगतसिंह कोश्यारी हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणून मी असा नमस्कार केला, असे राऊत यांनी सांगितले होते. मात्र, आता मनसेकडून याच फोटोचा वापर करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा राज्यपालांना कार्यकारी अधिकार नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही काही लोक राज्यपालांना भेटत असतात. मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली होती.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना भाजपसह राज ठाकरे यांनाही फैलावर घेतलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात. राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले होते.

संबंधित बातम्या:

बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान

राज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला

( MNS leader Sandeep Deshpande taunts Shivsena MP Sanjay Raut)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.