Marathi News Politics MNS leader sandeep deshpande tweets photo of Sharad Pawar and Brij Bhushan Singh on same stage
Sandeep Deshpande : तेल लावलेले पैलवान, गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान, संदीप देशपांडेंचं ट्विट चर्चेत
"तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे" असा आशय संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे.
तेल लावलेले पैलवान, गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान, संदीप देशपांडेंचं ट्विट चर्चेतImage Credit source: twitter
मुंबई – बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आयोध्या दौऱ्याला विरोध केल्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलं आहे. युपी यायचं असेल तर पहिली जनतेची माफी मागा, नाहीतर इथल्या साधू संतांची माफी मागा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली. त्यानंतर यामागे नेमकं कोण आहे याची चर्चा देखील राजकारणात सुरू झाली. त्यावर मनसेच्या अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधानं देखील केली आहे. भाजपचे खासदार आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्याने राज ठाकरेंना दौरा स्थगित करावा लागला. त्याबाबत आज मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये “त्यांनी तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांना विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” असा आशय लिहिला आहे. राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या सभेत मराठी पोरांना अडकवण्यचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले होते. तसेच निवडणुकीच्या तोंडावर केसेस पडण परवडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
<
तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे pic.twitter.com/de7zkUQigy
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 24, 2022
संदीप देखपांडेंचं खोचक ट्विट
“तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” असा आशय संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे. तसेच कुस्ती आखाड्यातील एक फोटो त्या आशयासोबत जोडला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बृजभूषण सिंह हे देखील फोटोत दिसत आहेत. महाराष्ट्रातील एका कुस्ती आखाड्यातील तो फोटो असण्याची शक्यता आहे. व्हायरल झालेल्या फोटोबाबत संजय राऊत यांनी स्षष्टीकरण दिलं आहे. आम्ही सुद्धा अनेकदा खासदारांना भेटलो आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. समजा उद्या मी योगी आदित्यनाथ यांना भेटलो तर त्यांना मी रसद पुरवली असं ते म्हणतील.
महाराष्ट्रातल्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती
भाजपच्या खासदारामागे महाराष्ट्रातल्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती. परंतु संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये फोटो शेअर केल्याने चर्चेला उधान आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जूनला होणारा अयोध्या दौरा आयोजित केला होता. परंतु भाजपच्या खासदारांनी तिथं विरोध केला.
तसेच त्यांच्या विरोधाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी चांगलं समर्थन दिल्याने, त्याचा नियोजित दौरा होणार की नाही याबाबत अनेकांना शंका होती. परंतु पुण्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी नियोजित स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे.