Sanjay Raut | राज ठाकरेंनी कारकूनाला सामनाचा संपादक बनवलं.. मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना टोला

गुलाबराव पाटील हे आधी पानटपरीवर बसायचे. त्यानंतर शिवसेनेत आल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. आता पुन्हा पानटपरीवर बसतील, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावरून संदीप देशपांडेंनी संजय राऊतांच्या कारकीर्दीवर भाष्य करणारं हे ट्वीट केलंय..

Sanjay Raut | राज ठाकरेंनी कारकूनाला सामनाचा संपादक बनवलं.. मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना टोला
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 10:20 AM

मुंबईः दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरीवाला, भाजी विकणारा म्हणणाऱ्या लोकांनी हे विसरू नये की, ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तिथून उचलून त्यांना सामनाचे संपादक बनवलं, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे (sandip Deshpande) यांनी संजय राऊतांना (sanjay Raut) लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी आज सकाळीच यासंदर्भाने ट्विट केलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवसेना आणि विशेषतः संजय राऊतांवर वारंवार ट्विटरच्या माध्यमातून किंवा उघडपणे निशाणा साधत असतात. गेल्या काही दिवसात संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केलीय. त्यात गुलाबराव पाटील हे आधी पानटपरीवर बसायचे. त्यानंतर शिवसेनेत आल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. आता पुन्हा पानटपरीवर बसतील, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावरून संदीप देशपांडेंनी संजय राऊतांच्या कारकीर्दीवर भाष्य करणारं हे ट्वीट केलंय..

संदीप देशपांडेंचं ट्विट काय?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांनावर निशाणा साधला. त्यात ते म्हणालेत ,’दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला ,भाजी विकणारा ,वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभा मध्ये कारकून होते तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवलं…

हे सुद्धा वाचा

मनसे हा पक्ष डिपॉझिट जप्तची मशीन

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीदेखील मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशीन आहे, असं वक्तव्य यांनी केलंय. तसंच दिवसेंदिवस मनसेचे लोकप्रतिनिधी निवडून येण्याची संख्या खालावत चाललीय, यावरही त्यांनी भाष्य केलंय. एका ट्विटमध्ये दिपाली सय्यद म्हणाल्या, मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता 11 वरून 1 वर आले आहेत आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते वजा नाही त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशेब बघुन घ्या. मनचे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे…’

सत्तानाट्यात आज काय महत्त्वाचं?

मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ता नाट्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या बंडखोरांनी अजूनही शिवसेना सोडण्याविषयीचे ठाम वक्तव्य केलेले नाही. तसेच आम्ही शिवसेनेतच असून उद्धव ठाकरे यांनी पुढील पेच सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, अशी गळ बंडखोर आमदारांनी घातली आहे. आता शिवसेना त्यांच्या या विनंतीला कितपत दाद देते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मागील आठवड्यात राज्य सरकारने अस्थिर परिस्थितीतही खूप मोठ्या संख्येने शासन निर्णय घेतले. एवढ्या घाईने निर्णय आणि जीआर काढण्यासंबंधी राज्यपालांनी आता महाराष्ट्र सरकारला विचारणा केली आहे. त्यावर राज्य सरकार आज उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या गोटातही हालचाली वाढल्याने अस्थिर महाविकास आघाडी सरकारला धक्का देत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपकडून मोठी रणनीती आखली जाऊ शकते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.