Raj Thackeray MNS Pune : भगवी शाल, हाती गदा, बजरंगबलीची आरती… राज ठाकरे यांचं भगवं रुप शिवसेनेला धडकी भरवणार?
गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) झालेल्या सभेत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाविकास आघाडीतील नेत्यांवरती सडकून टीका केली. तसेच मशिदीवरील भोंगे तात्काळ हटवण्याची मागणी केली. भोंगे हटले नाहीत तर मशिदीच्या समोर हनुमान चाळीसा लावण्यात येईल ही भूमिका घेतली.
मुंबई : गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) झालेल्या सभेत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महाविकास आघाडीतील नेत्यांवरती सडकून टीका केली. तसेच मशिदीवरील भोंगे तात्काळ हटवण्याची मागणी केली. भोंगे हटले नाहीत तर मशिदीच्या समोर हनुमान चाळीसा लावण्यात येईल ही भूमिका घेतली. तेव्हापासून राज्यातलं राजकीय वातावरणं एकदम गरम झालं होतं. त्यांचे पडसाद दुसऱ्या दिवशी घाटकोपरमध्ये पाहायला मिळाले. महाराष्ट्रातल्या (Maharashtra) सत्ताधाऱ्यांनी देखील राज ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली.
पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती
राज ठाकरेंच्या या भूमिकेचं अनेक संघटनांनी स्वागत देखील केलं. ज्यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली. त्यांना राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत उत्तर दिलं. मेळाव्यानंतर अनेकांनी राज यांच्या भूमिकेवरती टीका केली होती. त्यांच्यासाठी ठाण्यात राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उचलल्यानंतर सर्वज राजकीय पक्षांकडून आज हनुमान जयंती निमित्त महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आलं आहे. आज महाराष्ट्रात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात हनुमान मंदीरात आज मनसैनिकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यावेळी राज यांचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आला. महाआरतीवेळी पाहायला मिळालेलं राज ठाकरे यांचं रुप त्यांची आगामी राजकीय वाटचाल स्पष्ट करणारं होतं.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनच राज्यात राजकारण करणार हे स्पष्ट
मंदीरात पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांच्या खांद्यावर भगवी शाल देण्यात आली. त्यावेळी मनसैनिकांकडून देण्यात आलेली गदा राज यांनी वरती उचलून धरली. मंदीरात देण्यात आलेलं आरतीचं ताट हातात घेत राज यांनी हनुमानाची सगळ्यासोबत आरतीही केली. राज ठाकरे यांचं हे रुप मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनच राज्यात राजकारण करणार हे स्पष्ट करणारं आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांचं हे भगवं रुप शिवसेनेच्या मनात धडकी भरवणारं ठरेल, अशीही चर्चा आता राजकारणात सुरु झालीय. आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या महाआरतीला हजारोंच्या संख्येनं मनसैनिक उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांचा विजय असो, हिंदू जननायक अशा घोषणा देण्यात आल्या.