बाळासाहेबांचा वाघ ते राज ठाकरेंचा विश्वासू, मनसे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन

नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. (MNS Nanded Prakash Kaudage Dies)

बाळासाहेबांचा वाघ ते राज ठाकरेंचा विश्वासू, मनसे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन
मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 11:29 AM

नांदेड : मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हैद्राबादमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ काळ कौडगे यांनी शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख पद भूषवले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. (MNS Nanded District Chief Prakash Kaudage Dies in Hyderabad)

राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेप्रवेश

प्रकाश कौडगे यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी मनसेत प्रवेश केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कौडगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला होता. पक्ष प्रवेशासोबतच राज ठाकरे यांनी कौडगे यांच्यावर मनसेच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. नायगांव, भोकर आणि हदगांव या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रामराम

नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यांच्या मनसेप्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकद वाढल्याचंही बोललं जात होतं. त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी शोक प्रगट केला आहे.

प्रकाश कौडगे कोण होते?

नांदेड जिल्ह्यातील प्रकाश कौडगे यांचं मोठं नाव आहे. नांदेडच्या सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्यांचा चांगला दबदबा होता. प्रकाश कौडगे शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणून नावाजलेले होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश कौडगे यांनी वेगळा मार्ग अवलंबत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या बंडखोरीचा बराच फटका शिवसेनेला बसला होता.

शिवसेनेचे प्रदीर्घ काळ जिल्हाप्रमुख राहिल्याचा विक्रम कौडगे यांच्या नावावर होता. नांदेड जिल्ह्यातील समस्यांसाठी कौडगे यांनी एकेकाळी अनेक आंदोलने केली होती. लिंगायत समाजाच्या मागण्यासाठी ते कायम अग्रेसर राहायचे. तरुणांना आपलंसं करुन घेऊन त्यांचं संघटन करण्यात कौडगे निष्णात होते.

संबंधित बातम्या :

शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख मनसेत, राज ठाकरेंकडून थेट जिल्हाध्यक्षपदी वर्णी

(MNS Nanded District Chief Prakash Kaudage Dies in Hyderabad)

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.