अरुणोदय झाला… राज ठाकरेंकडून गाणं ट्वीट, मनसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा (MNS Party Anniversary) वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यंदा पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा हा मुंबईबाहेर नवी मुंबईत होत आहे.

अरुणोदय झाला... राज ठाकरेंकडून गाणं ट्वीट, मनसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी
Follow us
| Updated on: Mar 09, 2020 | 8:49 AM

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा (MNS Party Anniversary) वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यावेळी पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा हा मुंबईबाहेर नवी मुंबईत होत आहे. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता वाशी टोल नाक्यावरुन अमित ठाकरे यांची रॅली निघणार आहे. तर दुपारी 12 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशीत दाखल होणार आहेत.

मनसेचा वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी ‘अरुणोदय झाला’ गाणं ट्विट (MNS PartyAnniversary) करत सर्व मनसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यादरम्यान, मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी शनिवारी (8 मार्च) पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

हेही वाचा : आशिष शेलार एक तास ‘कृष्णकुंज’वर, 20 दिवसांत चौथ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला

शॅडो कॅबिनेटमधील संभाव्य मंत्र्यांची यादी 
  1. बाळा नांदगावकर, गृहमंत्री
  2. संदीप देशपांडे, नगरविकास
  3. नितीन सरदेसाई, अर्थ
  4. राजू उबरकर, कृषी
  5. रिटा गुप्ता, महिला बाल कल्याण
  6. किशोर शिंदे, कायदा सुव्यवस्था
  7. अमेय खोपकर, सांस्कृतिक मंत्री
  8. अभिजित पानसे, शालेय शिक्षण
  9. गजानन काळे, कामगार
  10. योगेश परुळेकर, सार्वजनिक बांधकाम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर आता नवी रणनीती आखली आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने ही रणनिती आखली आहे. मनसेनं पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, यंदा पक्षाचा वर्धापन दिन मुंबईबाहेर साजरा केला जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच, कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी यासाठीही हा नवा प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे.

मनसेचा नवा अजेंडा

गेल्या महिन्यात 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले होते.

विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात (MNS PartyAnniversary) आली.

आशिष शेलार-राज ठाकरे भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते (Raj Thackeray-Ashish Shelar Meet) आशिष शेलार यांच्यात पुन्हा खलबतं सुरु आहेत. आशिष शेलार हे शनिवारी सकाळी एक तास ‘कृष्णकुंज’वर (KrushnaKunj) असल्याची माहिती आहे. आशिष शेलार हे शनिवारी सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत ‘कृष्णकुंज’वर होते.

गेल्या 20 दिवसांत आशिष शेलार हे चौथ्यांदा (Raj Thackeray-Ashish Shelar Meet) राज ठाकरे यांच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर पोहोचले. त्यामुळे राजकीय गल्लीबोळांत मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाणं आलं आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीची समीकरणं जुळवण्यासाठी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात  (MNS PartyAnniversary) अनेकदा चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…

मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा नवी मुंबईत, शॅडो कॅबिनेट जाहीर होण्याची शक्यता

“ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.