AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबादची कराटे पटू प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ, राज ठाकरेंनी घेतले पालकत्व!

घरातला मुख्य आधार कोलमडून पडल्यामुळे निराधार झालेल्या पवार कुटुंबियांना राज ठाकरे यांच्या मदतीमुळे काहीसा आशेचा किरण दिसत आहे.

उस्मानाबादची कराटे पटू प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ, राज ठाकरेंनी घेतले पालकत्व!
| Edited By: | Updated on: Mar 02, 2022 | 4:45 PM
Share

उस्मानाबादः जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथील प्रणिता मोहन पवार (Pranita Pawar) ही उत्कृष्ट कराटे पटू आहे. 2017 मध्ये तिने श्रीलंका येथे झालेल्या ऑलिपिंक स्पर्धेत (Olympic Competition) कराटेमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाची मान उंचावली होती. मात्री दीड वर्षापूर्वी पवार कुटुंबियांवर संकट कोसळलं. प्रणिताचे वडील कोरोना संसर्गाने आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र प्रणिताला अर्थसहाय्य करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुढाकार घेतला आहे.

राज ठाकरेंनी साधला संवाद

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कराटे पटूची अशी अवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिता पवार आणि तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. प्रणिताचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र कोरोना काळात त्यांचं निधन झालं. आता प्रणिताची आई कसाबसा रोजगार मिळवून तीन मुलांचा सांभाळ करत आहेत. दिवसाची रोजी रोटी कशी बशी मिळते, पण मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचा, हा मुख्य प्रश्न त्यांच्या समोर आहे. ही बाब लक्षात घेता उस्मानाबाद येथील जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी पक्षप्रमुखांना सदर माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रणिताला अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी प्रणिताशी संवाद साधला. तसेच तिचे पालकत्व घेण्याचाही निर्णय जाहीर केला.

जिल्हाप्रमुखांच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आश्वासन

उस्मानाबादचे मनसे जिल्हाप्रमुख प्रशांत नवगिरे यांनी प्रणिता पवार हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन तिचा राज ठाकरे यांच्याशी संवाद घडवून आणला. तसेच तिच्या आतापर्यंतच्या क्रीडा विषयक कामगिरीची माहिती घेतली. राज ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, प्रणिताचे शैक्षणिक पालकत्व ते स्वीकारत असल्याचे कुटुंबियांना सांगितले. घरातला मुख्य आधार कोलमडून पडल्यामुळे निराधार झालेल्या पवार कुटुंबियांना राज ठाकरे यांच्या मदतीमुळे काहीसा आशेचा किरण दिसत आहे.

इतर बातम्या-

Pune | पुण्यात शौचालयाच्या टाकीत पडून तिघे बुडाले, टाकी साफ करता बुडालेल्यांचा गुदमरुन मृत्यू

‘संजना’कडून ‘अरूंधती’ला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!, फोटो शेअर करत म्हणाली…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.