राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोना लस, शर्मिला ठाकरेंची उपस्थिती

राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयजयवंती देशपांडे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये ही लस घेण्यात आली.

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोना लस, शर्मिला ठाकरेंची उपस्थिती
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 6:18 PM

मुंबई : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात कोरोना लस दिली जात आहे. अशावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबियांनीही कोरोनाची लस टोचली आहे.(Raj Thackeray’s mother Kunda Thackeray and sister Jayajaywanti Thackeray were vaccinated)

राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयजयवंती देशपांडे यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये ही लस घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

शरद पवारांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात घेतली लस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी 1 मार्च रोजी कोरोनाची लस (Covid 19 Vaccine) टोचून घेतली. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल शरद पवार आणि त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे रुग्णालयात दाखल झाल्या. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. पवारांनंतर सुप्रिया सुळे यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोना लस घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 20 आजारांची यादी

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या ( corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने या टीकाकरणासाठी 20 गंभीर आजारांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार येत्या 1 मार्चपासून लसीकरण केलं जात आहे.

60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल. तसेच ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यात हृदयरोग, सीटी / एमआरआय-स्ट्रोक, 10 वर्षांपेक्षा जास्त काळ मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड रोग इत्यादी रोगांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

देशी की परदेशी,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी कोणती लस घेतली?

कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती? जाणून घ्या सर्व माहिती

Raj Thackeray’s mother Kunda Thackeray and sister Jayajaywanti Thackeray were vaccinated

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.