शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल

'शरद पवार यांची भव्य मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राचं एक हुक, म्हणजे ज्यातून सर्वजण एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला? मला एक साधारण अंदाज होता की ते काय उत्तर देतील. त्या प्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे, तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही?

शरद पवार भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं का करत नाहीत? राज ठाकरेंचा सवाल
राज ठाकरे, शरद पवार
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 5:25 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केलाय. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या एका भव्य मुलाखतीमधील एका प्रश्नाचा दाखलाही दिला. ‘शरद पवार यांची भव्य मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राचं एक हुक, म्हणजे ज्यातून सर्वजण एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला? मला एक साधारण अंदाज होता की ते काय उत्तर देतील. त्या प्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे, तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार जर आपण पाहिला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. (MNS president Raj Thackeray’s question to Sharad Pawar)

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

‘मी यशवंतरावांचं लिखाणही वाचलं आहे’

आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.

‘..मग काय भूमिका बदलली काय?’

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जात-धर्माच्या आधारे नाही. लोक विकासाच्या मुद्द्यावरही मतदान करतात हे दिसलं. पण मी मुलाखतीत एका मुद्द्याच्या अनुषंगाने बोललो. आता काय चाललंय तर जातीचं वातावरण तयार करण्यात येतंय. मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. त्यावर पत्रकार म्हणाले, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण त्याचा काय संबंध. मी त्यांच्या वाढदिवसाला भाषण केलं होतं. त्याची सुरुवात होती, आजचा दिवस पाहता काही गोष्टी या राखूनच ठेवल्या पाहिजेत, वाढदिवशी आपण चांगलं बोलतो. मग म्हणजे काय भूमिका बदलली का? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी विचारलाय.

इतर बातम्या :

‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’, राज ठाकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर

‘त्याचा’ संबंध काय हे शरद पवारांनी मला एकदा समजावून सांगावं: राज ठाकरे

MNS president Raj Thackeray’s question to Sharad Pawar

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.