संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि रॉडने हल्ला, राज ठाकरे भेटीसाठी दाखल, मुंबईत काय घडतंय?

संदीप देशपांडे यांच्यावर नेमका कुणी हल्ला केला, यावरून चर्चांना उधाण आलंय. या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, यावरून आडाखे बांधले जात आहेत.

संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि रॉडने हल्ला, राज ठाकरे भेटीसाठी दाखल, मुंबईत काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:49 AM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी भीषण हल्ला झाला. या घटनेत संदीप देशपांडे यांचा हात आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) संदीप देशपांडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात संदीप देशपांडे यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज सकाळी हा हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ माजली. देशपांडे यांच्यावर नेमका कुणी हल्ला केला, यावरून चर्चांना उधाण आलंय. या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, यावरून आडाखे बांधले जात आहेत.

कुठे, कसा झाला हल्ला?

संदीप देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. एरवी त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असतात. मात्र आज ते एकटेच होते. ही संधी साधून दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला. हल्लेखोरांच्या हातात स्टम्प आणि रॉड होते. त्यांनी संदीप देशपांडे यांना माहहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र देशपांडे यांनीही चांगलाच प्रतिकार केला.

हात आणि पायाला दुखापत

हल्लोखोरांशी झटापट करत असताना संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र त्यांना डोक्याला किंवा शरीरीवर इतर कुठे जखम झाली नाही. हल्ल्यानंतर शिवाजी पार्कमधील लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.

मास्क घातलेले होते..

हा हल्ला नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लोखोरांनी तोंडावरून मास्क घातला होता. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. त्यावरून हे नेमके कोण आहेत, याचा तपास केला जाईल.

राज ठाकरे, शर्मिला ठाकरे भेटीला

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, सदा सरवणकर, भाजप आमदार नितेश राणे आदी नेते त्यांच्या भेटीसाठी आले.

संदीप देशपांडे व्हिलचेअरवरून बाहेर आले

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर संदीप देशपांडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. मात्र रुग्णालयातून बाहेर येताना ते व्हिलचेअरवर होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.