राज ठाकरेंचं मिशन महानगरपालिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि बरंच काही!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय. MNS Raj Thackeray will Visit Pune

राज ठाकरेंचं मिशन महानगरपालिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि बरंच काही!
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 1:29 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय. पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी, बैठका आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीविषयी रणनिती राज ठाकरे आखतील. (MNS Raj Thackeray will Visit Pune Over Pune Mahapalika Election)

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज घेणार मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बैठकीकमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा पार पडणार आहे. पुण्यातील मनसेची कार्यकारिणीही बदलण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीतील शिलेदारांना शुक्रवारी राज ठाकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

उद्या (शुक्रवार दि. 12) दुपारनंतर राज ठाकरे पुण्यात येतील. सायंकाळच्या सुमारास ते शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतील. तसंच काही पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीविषयी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. याच बैठकीत पुढील काही महिन्यांची मनसेची रणनिती ठरेल. शुक्रवारी पुण्यात मुक्काम करुन शनिवारी राज ठाकरे मुंबईकडे रवाना होतील.

डॅशिंग वसंत मोरेंना शहराध्यक्षपद

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवलं गेलंय.

सर्वसामान्यांमध्ये तात्या म्हणून लोकप्रिय असलेल्या वसंत मोरेंची नागरिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. तात्यांकडे आपण गेलो की आपलं काम होणार, हे गृहित धरुनच लोकं त्यांच्याकडे जातात. तात्याही लोकांना अजिबात नाराज करत नाही. कधी गोडीगुलाबीने तर कधी मनसे स्टाईलने ते नागरिकांचं हरएक काम पूर्ण करतात.

(MNS Raj Thackeray Visit Pune Over Pune Mahapalika Election)

हे ही वाचा :

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

“योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.