भूमीपुत्रांच्या भरतीसाठी मनसे आक्रमक, आधी विनंती नंतर खळखट्याकचा इशारा

मॅकेनिक, वेल्डर, टायरमन आदि पदांच्या भरतीत महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे मराठी भूमीपुत्रांचाच प्रथम हक्क आहे.

भूमीपुत्रांच्या भरतीसाठी मनसे आक्रमक, आधी विनंती नंतर खळखट्याकचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 7:10 PM

मुंबई : टपाल वाहन सेवेत होत असणाऱ्या रिक्त जागांच्या भरतीत स्थानिक मराठी भूमीपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे (Marathi Applicants Should Be Given First Priority), यासाठी सर्व प्रथम हात जोडून विनंती अर्ज मनसेच्या शिवडी विधानसभेतील पदाधिकारी शिष्टमंडळाने बुधवारी सकाळी दिला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष आणि शिवडी विधानसभा अध्यक्ष नंदकुमार चिले यांनी केले (Marathi Applicants Should Be Given First Priority).

मॅकेनिक, वेल्डर, टायरमन आदि पदांच्या भरतीत महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे मराठी भूमीपुत्रांचाच प्रथम हक्क आहे. ही समजच मनसे शिष्टमंडळाने वरीष्ठ व्यवस्थापक जॉन लुक यांना देण्यात आली आहे.

पारदर्शक आणि शासन नियमाप्रमाणे मराठी बेरोजगार भूमीपुत्रांसाठी या जागांवर पात्र, योग्य उमेदवारांची भरती करण्यात यावी अशी विनंती आणि आदेशही या शिष्टमंडळाने दिला आहे. मनसेच्या या शिष्टमंडळात उपविभाग अध्यक्ष संतोष नलावडे, चेतन पेडणेकर, विभाग सचिव- नंदू घाडी, शाखाध्यक्ष- विनायक खोपकर, निलेश इंदप, सपन पाठारे, राजेश मोरे,अशोक पाटील आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचे शिष्टमंडळ मराठी भूमीपुत्रांच्या नोकरभरतीसाठी आग्रही असल्याकारणाने असंख्य महाराष्ट्र सैनिक देखील त्या ठिकाणी जमा झाले होते.

आगामी काळात डाकसेवेत पारदर्शक पध्दतीने नोकर भरती न केल्यास आणि परप्रांतीय उमेदवारांची भरती झाल्यास मनसेचा खळखट्याक डाकसेवेत दिसून येईल आणि वरिष्ठ अधिकारी वर्गाला पळता भुई थोडी केली जाईल, अशी प्रतिक्रिया मनसे उपाध्यक्ष नंदकुमार चिले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मनसेच्या खळखट्याक अगोदरचा विनंतीचा पवित्रा मराठी भूमीपुत्रांना भरतीसाठी किती दिलासादायक ठरतो हे आगामी काळात दिसून येणार आहे.

Marathi Applicants Should Be Given First Priority

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंचा उदय सामंतांना फोन, शक्य तितक्या लवकर ग्रंथालये सुरू करु, सामंतांकडून आश्वासन

राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.