‘बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेकडून खंडणी सुरु’, संदीप देशपांडेंकडून पुरावे सादर
बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेकडून खंडणी सुरु असल्याचे पुरावे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भर पत्रकार परिषेदत सादर केले. | MNS Sandeep Deshpande Attacked Shivsena
मुंबई : ‘विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार’ हे माझं ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मी आज पुरावे घेवून आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते, असं सांगत भर पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या मांडल्या. (MNS Sandeep Deshpande Attacked Shivsena Over extortion In Mumbai)
“शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसंच सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर लिहिण्यात आलं आहे”, असं देशपांडे यांनी सांगितलं.
“फेरीवाल्यांना स्पष्टपणे सांगितलंय जातंय तुम्ही आम्हाला पैसे द्या.. महानगरपालिका तुमच्या स्टॉलला हात लावणार नाही… पोलिसांना आम्ही मॅनेज करु… बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून वसुली केली जातीय. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे”, असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांच्याा डोळ्यात पाणी आलं.
“आमची मागणी आहे की खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे… महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामिल आहेत का याची उच्चपदस्थ झाली पाहिजे”, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
“अशा खंडणाखोरांच्या हातून मुंबई वाचवणे गरजेचे आहे. चंबळखोरांचं राज्य मुंबईत आलंय की काय? असा प्रश्न मला कधीकधी पडतो”, अशी टीका करत मुंबई पोलिसांना भेटून यासंबंधीची सविस्तर तक्रार देणार आहे. पोलिसांनी या खंडणीखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
(MNS Sandeep Deshpande Attacked Shivsena Over extortion In Mumbai)
हे ही वाचा :
…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे
” कंपाऊंडर” डोक्यावर पडलेत का???” सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका