Narendra Modi : ‘प्याद्यालाही वजिराच्या ताकदीने खेळवता येतं!’ मोदी-शाहांच्या मास्टरस्ट्रोकची हीच ती रणनिती?

'प्याद्यालाही वजिराच्या ताकदीने खेळवता येतं!'- नरेंद्र मोदी

Narendra Modi : 'प्याद्यालाही वजिराच्या ताकदीने खेळवता येतं!' मोदी-शाहांच्या मास्टरस्ट्रोकची हीच ती रणनिती?
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 9:18 AM

मुंबई : राज्याच्या सत्तांतराचं नाट्य सध्या एका अनपेक्षित वळणावर आलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. पण भाज या सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसेल. तर भाजपचा बाहेरून पाठिंबा असेल, असं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर केलं. त्यानंतर शपथविधी आधी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्याचा आदेश दिला. आपल्या इच्छेला मुरड घालत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांचा गेम केल्याची चर्चा आहे. त्यावरच भाष्य करणारा एक व्हीडिओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे आणि त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे.

संदीप देशपांडे यांचं ट्विट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे. या नरेंद्र मोदी बुद्धिबळाचा खेळ समजावत आहेत.

हे सुद्धा वाचा

“आपली स्वत:ची एक ताकद असते. युनिक क्षमता असते. तुम्ही जर एखाद्या मोहऱ्याला घेऊन एखादी चाल केली. त्याच्या ताकदीचा योग्य उपयोग केला तर तो सर्वात शक्तिशाली बनतो. एवढंच नव्हे तर एक प्यादा ज्याला सर्वात कमजोर समजलं जातं, तोही सर्वात ताकदवान मोहरा बनू शकतो. गरज आहे फक्त योग्यवेळी योग्य चाल खेळण्याची, योग्य पाऊल उचलण्याची मग तो मग तो प्यादा चेसबोर्डवरच्या हत्ती, उंट, वजीरची ताकदही मिळवू शकतो”, असं नरेंद्र मोदी यांनी या व्हीडिओमध्ये म्हटलंय.

मोदींचा दोनदा फोन

फडणवीस यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नव्हतं. आपण मुख्यमंत्री होतो. त्यामुळे पुन्हा खालच्या पदावर कशाला जायचं अशी त्यांची भूमिका होती. मात्र, पक्षाच्यावतीने त्यांच्यावर दबाव वाढत होता. शिंदे मंत्रिमंडळावर भाजपचा वचक राहिला पाहिजे. तसेच महत्त्वाचे निर्णय घेताना ते पटकन घेता आले पाहिजे, यासाठी पक्षश्रेष्ठींना फडणवीस मंत्रिमंडळात हवे होते. पण फडणवीस तयाला तयार नव्हते. त्यामुळे शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फडणवीसांना दोनदा फोन करावा लागला. त्यामुळे फडणवीस यांना नाही म्हणता आलं नाही आणि त्यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.