उद्धव ठाकरे सपशेल अपशयी, हिंदुत्व असेल, तर ते दिसत का नाही?, संदीप देशपांडेंचा सवाल
या मुलाखतीतून फक्त भाजपला धमकवण्याचे काम झाले," असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. (MNS Sandeep Deshpande On CM Uddhav Thackeray Interview)
मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे माझा सामना, माझी मुलाखत अशी होती. या मुलाखतीतून फक्त भाजपला धमकवण्याचे काम झाले,” असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. (MNS Sandeep Deshpande On CM Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
“उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे ‘माझा सामना, माझी मुलाखत’ अशी होती. एरव्ही उद्धव ठाकरेंना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सामान्यांच्या हिताबद्दल बोलले जात नाही. उद्धव ठाकरे सपशेल अपशयी ठरले आहेत,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
“जर उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये हिंदुत्व असेल, तर ते दिसत का नाही. बेरोजगारी, वीजबील, या विषयावर ते बोलत का नाहीत. या मुलाखतीतून फक्त भाजपाला धमकवण्याचे काम झाले,” असा आरोपही संदीप देशपांडेंनी केला.
गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर वातावरण पेटतं आहे, त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “पेटत नाही. मुळामध्ये ‘वाढीव’ हा जो शब्द आहे तो वाढीव आहे का? हा विषय मंत्रिमंडळात पण चर्चिला जातो. खरंच मीटरमुळे काही बिले वाढलीत का? का दोन-तीन महिन्यांची बिले एकदम आली आहेत? त्यामुळे ती वाढ झाली आहे,” असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
आता किती झालाय डॉलरचा भाव? काय व्यवस्था तुम्ही केली? आमच्या अंगावर येण्याआधी निदान बाहेर पडताना आरशात तुमचं तोंड तर बघ. पण काय झालंय, हल्ली बरेच जण स्वतःचं तोंड आरशात बघितल्यानंतरही बोंबलतात की, भ्रष्टाचार झाला… भ्रष्टाचार झाला. सगळे अवाक होतात,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. (MNS Sandeep Deshpande On CM Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
Video : Uddhav Thackeray LIVE | हिंदुत्व म्हणजे धोतर नव्हे, सोडून द्यायला – उद्धव ठाकरे#UddhavThackeraylive @rautsanjay61 @ShivsenaComms pic.twitter.com/gMH0JnOwLp
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
संबंधित बातम्या :
पुढच्या निवडणुका एकत्र लढवून सरकार रिपीट होणार, भुजबळांना विश्वास
तुम्ही ड्रायव्हिंग का करताय?, उद्धव ठाकरे म्हणतात…
हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा भाजपसह राज्यपालांवर पलटवार