राज्य सरकारने विद्युत कंपन्यांवर ऑडिटर नेमावा, मनसेची मागणी

मग युनिटचे दर का वाढले जात आहे? असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. (Sandeep Deshpande on Electricity Bill hike)

राज्य सरकारने विद्युत कंपन्यांवर ऑडिटर नेमावा, मनसेची मागणी
sandeep deshpande
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 1:36 PM

मुंबई : “वाढीव वीजबिलावरुन सध्या राजकारण सुरु आहे. नुकतंच मनसे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. बेस्ट वीज बिलाच्या दरात तफावत पाहायला मिळत आहे. युनिट दरात खोटी वाढ दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक झाली आहे. बेस्टचे इलेक्ट्रीक व्यवस्थापन नफ्यात आहे. मग युनिटचे दर का वाढले जात आहे?” असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. (Sandeep Deshpande on Electricity Bill hike)

“बेस्टने एमएआरसीकडून खर्च वाढला, असं सांगून आपले युनिटचे दर वाढवून घेतले आहेत. मात्र बेस्टच्या विद्युत विभागाने कामगारांना त्यांची थकबाकी दिलेली नाही. बेस्टच्या सबस्टेशनची दुरुस्ती केली नाही. मग यांना कोणता खर्च आहे?” असेही संदीप देशपांडे म्हणाले.

“बेस्टने हा सर्व खोटा खर्च दाखवला आहे. त्यामुळे हे सर्व खोटं सुरु आहे. जर बेस्ट विद्युत विभाग असं करत आहे, तर इतर खासगी विद्युत कंपन्या काय करत असतील, याचा विचार करावा लागेल. सरकारने या सर्व कंपन्यांवर ऑडिटर नेमावा,” अशी मागणीही संदीप देशपांडेंनी केली आहे.

“बेस्ट महाव्यवस्थापकांनी राजीनामा द्यावा. ग्राहकांचे अतिरिक्त पैसे परत द्यावे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याचे उत्तर द्यावे. सर्व कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा सरकारने दाखल करावा,” असे संदीप देशपांडे म्हणाले.

“राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. सध्या फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचं काम सुरू आहे. जनतेकडे कोण बोलत नाही. सर्व सामान्यांचे प्रश्न कोणी हाताळत नाही. वीज मीटर कोणी कापायला आले, तर मनसैनिक धडा शिकवतील,” अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी केली. (Sandeep Deshpande on Electricity Bill hike)

संबंधित बातम्या : 

तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती; राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार, पत्रकार परिषदेत मोठे खुलासे करण्याची शक्यता

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.