मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं मनसेकडून पहिल्यांदाच जाहीर स्वागत; काय आहे मनसेचं ट्विट?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून विरोधकांमध्येच श्रेयवाद सुरू झाला आहे. (raj thackeray)
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून विरोधकांमध्येच श्रेयवाद सुरू झाला आहे. आपल्या आंदोलनामुळे सरकारने लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगत मनसेने मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे लोकलच्या श्रेयावरून विरोधकांमध्येच चढाओढ सुरू झाल्याचं दिसून येत आहे. (mns thanks to cm uddhav thackeray over announcement of Mumbai local train services to resume)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनसेने ट्विट केलं आहे. ‘मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचं अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे,’ असं ट्विट मनसेने केलं आहे. विशेष म्हणजे मनसेने पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भाजप म्हणते
मुख्यमंत्र्यांन लोकल सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपने कालच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. राज्य सरकारच्या लोकसंदर्भातील निर्णयावर बोलताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सरकारने हा निर्णय उशिरा घेतला असं म्हटलंय. “घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच आहे. नेहमी सकारात्मक राहायला पाहिजे. पण उशीर झाला. व्यापार सुरु झाला पहिजे असं विरोधी पक्ष म्हणत होता. लोकल सुरु व्हायला पाहिजे अशी आमची मागणी होती. तसेच मंदिरं सुरु व्हायला पाहिजेत. दीड ते दोन वर्षांपासून लोक बंदीस्त आहेत. लोक वेडे व्हायला लागले आहेत. दीड ते दोन वर्षांपासून अर्थार्जन बंद आहे. त्यामुळे हा वर्ग कसा जगला याबद्दल प्रश्नच आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट 2021 पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली होती. मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले होते. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. (mns thanks to cm uddhav thackeray over announcement of Mumbai local train services to resume)
#MumbaiLocals#मुंबईलोकल pic.twitter.com/k9IlIT1JS3
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 8, 2021
संबंधित बातम्या:
लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारची रेल्वेशी चर्चा नाही?; दानवेंचा दावा काय?
राज्यातली मंदीर, प्रार्थना स्थळं कधी सुरु होणार? मुख्यमंत्र्यांकडून पहिल्यांदाच ठोस माहितीची घोषणा
(mns thanks to cm uddhav thackeray over announcement of Mumbai local train services to resume)