खळ्ळखट्यॅक ऐवजी पॉ-पॉ! ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसेचं ‘हॉर्न वाजवा आंदोलन’

शासनाकडून या चालकांना मदत मिळावी, यासाठी मनसे वाहतूक कामगार सेना हॉर्न वाजवा आंदोलन करणार आहे. (MNS Transport Department Horn Ok Please Protest)

खळ्ळखट्यॅक ऐवजी पॉ-पॉ! ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसेचं 'हॉर्न वाजवा आंदोलन'
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 3:36 PM

मुंबई : ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेने ‘हॉर्न वाजवा आंदोलन’ पुकारले आहे. उद्या (शुक्रवार 12 जून) संध्याकाळी 5 वाजता एक मिनिटासाठी मनसे ‘हॉर्न वाजवा आंदोलन’ करणार आहे. (MNS Transport Department Horn Ok Please Protest)

गेले अडीच महिने लॉकडाऊनमुळे टॅक्सी, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक वाहतूक व्यवसाय बंद आहे. यावर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कुटुंबियांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या वेदनेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचावा, वाहतूक क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष वेधले जावे आणि शासनाकडून या चालकांना मदत मिळावी, यासाठी मनसे वाहतूक कामगार सेना हॉर्न वाजवा आंदोलन करणार आहे.

राज्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक, बस, लक्झरी वाहने स्टँडवर एकत्र येऊन एक मिनिट ‘हॉर्ननाद’ करतील. या आंदोलनात राज्यातील सर्व वाहतूक संघटना सहभागी होणार आहेत, असा दावा मनसेच्या वाहतूक शाखेने केला आहे.

हेही वाचा : “योगी आदित्यनाथ, मग तुम्हीही लक्षात ठेवा…” राज ठाकरे यांचा थेट इशारा

लॉकडाऊनच्या काळातील नुकसान भरुन काढण्यासाठी महाराष्ट्राशेजारी असलेल्या अनेक राज्यांनी वाहनचालकांना दिलासा दिला आहे. दिल्ली, पंजाबसह अन्य राज्यांनी आर्थिक मदतही केली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारला वाहतूकदारांच्या मागण्यांवर साधी चर्चा करणेही योग्य वाटत नसल्याची खंत वाहतूक शाखेने व्यक्त केली आहे.

तीन महिने उलटल्यानंतरही वाहतूक क्षेत्रासाठी धोरण जाहीर केलेले नाही. वाहतूकदारांच्या समस्यांबाबत राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे, त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून सांगण्यात आले आहे.

(MNS Transport Department Horn Ok Please Protest)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.