गंगेत प्रेतांचा खच हा राम मंदिरा इतकाच महत्त्वाचा मुद्दा, मोहन भागवतांनी भाष्य करावं; संजय राऊतांचं आवाहन
गंगा नदीत प्रेतांचा खच आढळून आला आहे. या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. (mohan bhagwat should speak on issues of dead body in ganga, says sanjay raut)
मुंबई: गंगा नदीत प्रेतांचा खच आढळून आला आहे. या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. गंगा नदीत प्रेतं सापडली. हाही हिंदुत्वाचा मुद्दा आहे. राम मंदिरा इतकाच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी त्यावर बोलावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. (mohan bhagwat should speak on issues of dead body in ganga, says sanjay raut)
संजया राऊत यांनी मीडियाशी बोलताना हे आवाहन केलं. मोहन भागवत हे आदरणीय आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांच्या मताला देशात आजही महत्त्व आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषत: गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेतं वाहून आली. त्यांच्यावर धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता. राम मंदिरा इतकाच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा होती. मोहन भागवत यांनीही त्यावर भाष्य केलं पाहिजे. भागवत यांनी या मुद्द्यावर बोलावं, असं मी त्यांना आवाहन करतो, असं राऊत म्हणाले.
तर राजभवानात पेढे वाटू
विधान परिषद सदस्यांची यादी सापडली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यावर राज्यपालांनी सही केली तर संपूर्ण राजभवनात आम्ही पेढे वाटू, असा चिमटा काढतानाच फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही. बरं भूतं असली तरी ती त्यांच्या आसपासचीच असतील, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
ती काय बोफोर्सची फाईल आहे का?
राज्यपाल त्या फायलीवर का सही करत नाहीत? ती काय बोफोर्सची फाईल आहे का? की कुठल्या भ्रष्टाचाराची फाईल आहे? असा सवाल करतानाच सहा-आठ महिने झाले तरी या फायलीवर सही होत नाही. हे महाराष्ट्राच्या गतीमान प्रशासनाच्या कारभाराला शोभणारं नाही. राज्यपालांनी ही गतिमानता दाखवावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
आरटीआयमधून धक्कादायक खुलासा
दरम्यान, गेल्यावर्षी 6 नोव्हेंबरला महाविकास आघाडीतील नेते नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनात जाऊन ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली होती. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीबाबत चकार शब्दही काढलेला नाही. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाचा यादी मागितली होती. मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे यावरून राजकारण सुरू झाले होते. अखेर गोपनीयतेच्या कारणामुळे राजभवनाला ही यादी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सचिवालयाकडून देण्यात आले होते. मात्र, आता 12 आमदारांची ही यादी राजभवनातच असल्याने राज्यपाल कोश्यारी त्याबाबत काही निर्णय घेणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही राज्यपाल कोश्यारी यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. (mohan bhagwat should speak on issues of dead body in ganga, says sanjay raut)
VIDEO :SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 25 May 2021https://t.co/7JLqlK1AXc
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
संबंधित बातम्या:
राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले
राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र
(mohan bhagwat should speak on issues of dead body in ganga, says sanjay raut)