Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मेरा पैसा वापस कर’, मोहित कंबोजचं संजय राऊतांना उद्देशून ट्विट, त्याच ट्विटवरचे हिडन पब्लिक मेसेज वाचलात का?

संजय राऊत हे आपल्या घरी आले होते आणि अनेक वर्षे ते गणपतीसाठी येतात, असं सांगत कंबोज यांनी राऊतांसोबतचा एक फोटोही दाखवला. इतकंच नाही तर राऊतांनी गरज भासल्यानंतर आपल्याकडे पैशांचीही मागणी केली होती, असा दावा करत कंबोज यांनी झालेल्या व्यवहाराचा दाखलाही ट्वीटरद्वारे दिला होता. त्यानंतर आता कंबोज यांनी राऊतांना उद्देशून 'माझे पैसे परत कर', असंही एक ट्वीट केलं आहे.

'मेरा पैसा वापस कर', मोहित कंबोजचं संजय राऊतांना उद्देशून ट्विट, त्याच ट्विटवरचे हिडन पब्लिक मेसेज वाचलात का?
संजय राऊत, मोहित कंबोज
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 6:57 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी मोहीत कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरही गंभीर आरोप केलाय. त्यात पत्राचाळ भूखंड प्रकरणाचाही समावेश आहे. राऊत यांनी केलेल्या आरोपांना मोहित कंबोज यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांना ओळखत नसल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत हे आपल्या घरी आले होते आणि अनेक वर्षे ते गणपतीसाठी येतात, असं सांगत कंबोज यांनी राऊतांसोबतचा एक फोटोही दाखवला. इतकंच नाही तर राऊतांनी गरज भासल्यानंतर आपल्याकडे पैशांचीही मागणी केली होती, असा दावा करत कंबोज यांनी झालेल्या व्यवहाराचा दाखलाही ट्वीटरद्वारे दिला होता. त्यानंतर आता कंबोज यांनी राऊतांना उद्देशून ‘माझे पैसे परत कर’, असंही एक ट्वीट केलं आहे.

राऊतांनी केलेल्या आरोपांवर बोलताना मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं होतं. ‘राऊतांनी सुरुवात केली की मोहित कंबोजला मी ओळखत नाही. 4 सप्टेंबर 2017 ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात. मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, असा दावा कंबोज यांनी केलाय. त्याचबरोबर कंबोज यांनी राऊतांना दिलेल्या पैशांचा व्यवहारही उघड केला होता. कंबोज यांनी ट्विटरवर पैशाच्या व्यवहाराचा पुरावाच दिला.

त्यानंतर आता कंबोज यांनी संजय राऊत यांना टॅग करत @SanjayRaut मेरे पैसा वापर कर! असं ट्वीट केलं आहे.

मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया

मोहित कंबोज यांनी ट्विटरवरुन राऊतांना पैसे परत करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. मोहित कंबोज यांचं हे ट्वीट आतापर्यंत दीड हजारापेक्षा अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे. तर जवळपास अडीचशे लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियांमध्ये काही प्रतिक्रिया या स्वाभाविकपणे शिवसेना आणि संजय राऊत समर्थकांच्याही आहेत. तर काही प्रतिक्रिया मोहित कंबोज आणि भाजपच्या बाजूच्या आहेत. यात अनेक प्रतिक्रिया मजेशीर आहेत. त्यातीलच काही प्रतिक्रिया आपण पाहू.

इतर बातम्या : 

‘शिवसेनेला अडचणीत आल्यावरच मराठी माणसाची आठवण होते’, मनसेचे संदीप देशपांडे यांचा खोचक टोला

Punjab Election 2022: गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत, मनमोहन सिंग यांची मोदींवर बोचरी टीका

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.