Assembly Session : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्यांना दणका, तृणमुलचे 6 खासदार एक आठवड्यासाठी निलंबित, एकूण 11 जणांवर कारवाई

राज्यसभेत गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी खासदारांवर कारवाई करण्यात आली. उपसभापतींनी 11 खासदारांना निलंबित केले.

Assembly Session : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्यांना दणका, तृणमुलचे 6 खासदार एक आठवड्यासाठी निलंबित, एकूण 11 जणांवर कारवाई
राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्यांना दणका, तृणमुलचे 6 खासदार एक आठवड्यासाठी निलंबित, एकूण 11 जणांवर कारवाईImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 3:01 PM

नवी दिल्लीपावसाळी अधिवेशनात (Monsoon Assembly Session) महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. या गदारोळामुळे राज्यसभेतील 11 खासदारांना (Rajyasabha MP) आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी काँग्रेसच्या (Congress) चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. राज्यसभेत गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी खासदारांवर कारवाई करण्यात आली. उपसभापतींनी 11 खासदारांना निलंबित केले. या खासदारांमध्ये तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए.ए. रहीम, कनिमोझी, एल. यादव आणि व्ही.व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांचा समावेश आहे. देशात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलं आहे. अशातच या खासदारांचं निलंबन झाल्याने विरोधक आता आणखी आक्रमक मोडवर येण्याची शक्यता आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

एक आठवड्यासाठी खासदारांचं निलंबन

खासदारांवर ही कारवाई उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी केली आहे. खासदारांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर उपसभापतींनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.

याआधी काँग्रेसच्या चार जणांचं निलंबन

तत्पूर्वी सोमवारी लोकसभेत विरोधी खासदारांनी महागाई आणि जीएसटीच्या वाढत्या दरांविरोधात निदर्शने केली. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या चार खासदारांवर कारवाई करण्यात आली. मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमणी, रम्या हरिदास यांना संपूर्ण अधिवशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीवरून राडा

दुसरीकडे ईडीने आज सोनिया गांधी यांची चौकशी केली. ईडीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसने संसदेपासून रस्त्यापर्यंत गदारोळ केला. काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला तर काँग्रेसच्या कार्यालयातून बाहेर पडत काँग्रेस नेत्यांनी निदर्शने केली. यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. याठिकाणी राहुल गांधीही आंदोलनाला बसले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या 50 खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या देशभरातील राजकीय वातावरणही तापलं आहे.  महाराष्ट्रातही काँग्रेस नेत्यांनी या ईडी चौकशीविरोधात जोरदार आंदोलनं केली आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.