‘अधिवेशनात जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन संपवलं जातं. कोरोना असूनही इतर कारणं आहे. जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

'अधिवेशनात जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू', फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 6:52 PM

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचं कामकाज दोन दिवस ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केलीय. कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन संपवलं जातं. कोरोना असूनही इतर कारणं आहे. जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय. राज्य सरकारनं अधिवेशनापासून पळ काढलेला आहे. हे सरकार अधिवेशनाला तोंड देऊ शकत नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government over two-day monsoon session)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाहीला कुलुप ठोकण्याचं काम केलं गेलं आहे. लोकशाहीच्या सगळ्या प्रथा, परंपरा, पांयडे पायदळी तुडवून उद्याच काही बिल मांडण्यात येणार आहेत. तर, परवा पुरवण्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात पुरवणी मागण्यांमध्ये उल्लेख नसेल तर त्यावर बोलता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. दुधाच्या दराचा प्रश्न आहे. दूध दर 15 रुपयांवर गेलेला आहे. सोयाबीन, आंबा कापूस या पिकांचे प्रश्न आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे, त्यावर चर्चा थांबलेली आहे. धानाचा प्रश्न गंभीर आहे, असे अनेक मुद्दे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

‘लोकशाहीला कुलुप लावल्यानं लोकशाही थांबणार नाही’

आम्हाला टेक्निकली बोलू दिलं जाणार नाही, असं दिसतंय, राज्यातील अनेक प्रश्न आहेत. ते माडांयचं कुठं हा प्रश्न आहे. लोकशाहीला कुलुप लावल्यानं लोकशाही थांबेल असं जर कुणाला वाटेल तर तसं होणार नाही. प्रश्न रस्त्यावर मांडू, माध्यमांसमोर मांडू, सभागृहात मांडू, असा इशारा फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

MPSCला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे

पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीसांनी माझं ‘ते’ मत ऐकलं असतं तर आज मुख्यमंत्री असते, आठवले बोलता बोलता बरंच बोलून गेले!

MPSCला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार नव्हे, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government over two-day monsoon session

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.