AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रुपाली चाकणकरांना ओळखत नाही’, चाकणकरांच्या ‘बंटी-बबली’च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर

मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. ओळखीच्या माणसांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन, अशा शब्दात राणा यांनी रुपाली चाकणकरांना टोला लगावलाय.

'रुपाली चाकणकरांना ओळखत नाही', चाकणकरांच्या 'बंटी-बबली'च्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर
रुपाली चाकणकर, खासदार नवनीत राणा
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 2:40 PM
Share

अमरावती : बायको जात चोरते आणि नवरा राजदंड अशी जहरी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्याला आता खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलंय. मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. ओळखीच्या माणसांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन, अशा शब्दात राणा यांनी रुपाली चाकणकरांना टोला लगावलाय. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर रुपाली चाकणकर यांनी बायको जात चोरते तर नवरा राजदंड चोरतो अशी जहरी टीका केली होती. (MP Navneet Rana responds to NCP leader Rupali Chakankar’s criticism)

मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ज्यांना मी ओळखतच नाही त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, अशा टोला खासदार नवनीत राणा यांनी रुपाली चाकणकरांना लगावलाय. दरम्यान, नवनीत राणा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी एक चर्चा सुरु होती. मात्र, जातवैधता प्रमाणपत्राच्या वादावरुन नवनीत राणा अडचणीत सापडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच त्यांना दिलासा दिला आहे. याबाबत विचारलं असता मला फक्त दोनच वर्ष झाली आहे. मला अजून खूप काम करायचं आहे. तसंच आपण अपक्ष खासदार असल्याचंही नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मंत्र्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी बबली निघाले”

रूपाली चाकणकर सातत्याने म्हणजेच संधी मिळेल तेव्हा नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. पाठीमागच्या महिन्यात हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन त्यांना दणका दिला. तर काल विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. हाच धागा पकडत घालत चाकणकर यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केलाय. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी-बबली निघाले”, अशा शब्दात चाकणकर यांनी नवनीत आणि रवी राणांवर तोफ डागली होती.

रवी राणा यांनी राजदंड पळवला

महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन काल संपन्न झालं. हे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने गाजवलं. विरोधक असलेल्या भाजपला ठाकरे सरकारने बॅकफूटवर ढकललं. यात मॅन ऑफ द मॅच ठरले ते कोकणातले भास्कर जाधव… भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करून पहिल्या दिवशीच सत्ताधारी विरोधकांवर हावी झाले… दुसऱ्या दिवशीही 12 आमदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय भाजपने घेतला. यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रती विधानसभेतही मोठा गोंधळ आणि राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

याच दरम्यान आमदार रवी राणा यांनी विधानसभेत एन्ट्री केली आणि त्यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोरचा राजदंड पळवला. “या राज्यात शेतकऱ्यांचे, कामगारांचे, महिलांचे, ओबीसी आणि मराठा बांधवांचे प्रश्न ऐरणीवर आहेत… त्यावर आपण चर्चा करावी…सत्यासंदर्भातलं माझं निवेदन तात्काळ स्वीकारा…” असं तालिका अध्यक्षांना रवी राणा म्हणाले.. त्यावर तालिका अध्यक्षांनी देखील तितकीच आक्रमक भूमिका घेत, “अध्यक्ष थेट निवेदन स्वीकारत नाहीत… तुमचं निवेदन खाली जमा करा…” असं सांगत विधिमंडळात सर्व घटकांवर चर्चा होत आहे, तुम्ही सहभाग नोंदवा, तुम्हाला पुरेपुर संधी दिली जाईल, पण स्टंट बाजीला येथे कुठला थारा नाही…. तुम्ही जरी राजदंड पळवला तरी कामकाज थांबणार नाही” असं जाधवांनी ठणकावून सांगितलं…!

संबंधित बातम्या :

खासदार नवनीत राणा यांना धक्का, जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द

Navneet Rana: कोण आहेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा?

MP Navneet Rana responds to NCP leader Rupali Chakankar’s criticism

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.