घराशेजारीही जावडेकरांना कुणी ओळखत नाही : संजय काकडे

पुणे : मटका लागतो कधी कधी, या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाच कार्यकर्ते मागे नसलेल्या प्रकाश जावडेकरांना मंत्रिपदाची बंपर लॉटरी लागली. घराच्या शेजारीही जावडेकरांना कोण ओळखत नाही, अशी जहरी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली. संजय काकडे नेमकं काय […]

घराशेजारीही जावडेकरांना कुणी ओळखत नाही : संजय काकडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

पुणे : मटका लागतो कधी कधी, या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाच कार्यकर्ते मागे नसलेल्या प्रकाश जावडेकरांना मंत्रिपदाची बंपर लॉटरी लागली. घराच्या शेजारीही जावडेकरांना कोण ओळखत नाही, अशी जहरी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली.

संजय काकडे नेमकं काय म्हणाले?

“पाच कार्यकर्ते मागे नसलेल्या प्रकाश जावडेकरांना तर बंपर लॉटरी लागली. घराच्या शेजारीही जावडेकरांना कुणी ओळखत नाही. 2019 च्या निवडणुकीत त्यांना कळेल मटका की सर्व्हे आहे. जावडेकर एक नगरसेवकही निवडून आणू शकले नाहीत. कार्यकर्तेही घडवू शकले नाहीत. मात्र, यानंतरही जावडेकर यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आहे. ही तर बंपर लॉटरी आहे.” असा निशाणा संजय काकडे यांनी प्रकाश जावडेकर यांच्यावर साधला. तसेच, देशाला आणि राज्याला जावडेकरांचा पक्षासाठी केलेला त्याग  माहिती आहे, असा टोमणाही खासदार काकडे यांनी लगावला.

संजय काकडे काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार?

संजय काकडे कोण आहेत?

संजय काकडे हे सध्या भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार आहेत. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. भाजपचे सहयोगी खासदार असले, तरी सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. मात्र त्यांनी गेल्या काही निवडणुकांच्या निमित्ताने भाजपवर शरसंधान साधलं.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.