AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी, अजितदादा म्हणतात….

शिवसेना ही सर्टिफाईड गुंडा पार्टी आहे, मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी, अजितदादा म्हणतात....
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 10:31 AM

जालना : मराठा आरक्षणाची बैठक समाधानकारक झाली. पुन्हा पुढच्या आठवड्यात मराठा आरक्षणासाठी बैठक नियोजित केली आहे. मंत्री अशोक चव्हाण आणि मला मुख्यमंत्र्यांनी काही मुद्दे सांगितले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. इतंकच नाही तर कोणाची युती-आघाडी कोणाबरोबर अशी कोणी चर्चा करत असलं तरी सरकारचं कामकाज व्यवस्थित चालू आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी (Shiv Sena certified gunda party) असल्याचं म्हटलं होतं, त्यावरही अजित पवारांनी (Ajit Pawar) भाष्य केलं. (MP Sanjay Raut said Shiv Sena is certified gunda party, now Maharashtra DCM Ajit Pawars reaction)

पहिल्या मराठा मोर्चानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांना राज्य सरकारने चर्चेचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संभाजीराजे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. आता पुढच्या आठवड्यातही मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

सरकार मजबूत

दरम्यान, राज्यात कोणी कोणाबरोबर चर्चा करत असलं, तरी सरकार व्यवस्थित चालू आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. हे लोकशाहीचे लक्षण आहे. सध्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. सध्या कोरोनाचे सावट आहे. पाऊस पडतोय शेतकऱ्यांना खतं, बियाणे कसे मिळतील यावर सरकरचे लक्ष आहे, असं अजित पवार म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, शिवसेना सर्टिफाईड गुंडा, अजितदादा म्हणतात..

शिवसेना ही सर्टिफाईड गुंडा पार्टी आहे, मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोणी काहीही बोलतं, कुठलाही पक्ष स्वतः गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम चालवणं, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं असं काम मुख्यमंत्री करत आहेत”  

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते? 

शिवसेना गुंडगिरी करते. पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत.

VIDEO : अजित पवार काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

‘होय… शिवसेना गुंडगिरी करते, शिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

VIDEO: शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार

(MP Sanjay Raut said Shiv Sena is certified gunda party, now Maharashtra DCM Ajit Pawars reaction on sena bjp clashes)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.