‘बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच’, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला

'बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी आपलं शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यासोबतच राऊत यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींनी मृत्युमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी. तसंच लाल किल्ला हिंसाचारासह शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

'बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच', संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला
संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 2:03 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी केली. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्राच्या निर्णयाचं स्वागत होतं असलं तरी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली जातेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. राऊत यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान मोदींना जोरदार टोला लगावलाय. (MP Sanjay Raut’s criticism of PM Narendra Modi and BJP on the issue of agriculture law)

‘बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी आपलं शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यासोबतच राऊत यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींनी मृत्युमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी. तसंच लाल किल्ला हिंसाचारासह शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

‘पंतप्रधानांची 7 वर्षात पहिल्यांदा जनतेचा आवाज ऐकला’

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला होता. पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

‘सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठेपणाची होती’

गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणाचा शेतकरी तीन कृषी कायदे, काळे कायदे याविरुद्ध संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठेपणाची होती. काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. या संपूर्ण काळात 450 च्या आसापास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, आत्महत्या झाल्या. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं. लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. प्रचंड दबावाचं राजकारण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या उपमा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असंही राऊत म्हणाले.

इतर बातम्या :

एसटीच्या महिला कर्मचारी अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार! पडळकरांनी सांगितली आंदोलनाची पुढील दिशा

‘चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ’, कृषी कायद्यावरुन संजय राऊतांचा जोरदार टोला

MP Sanjay Raut’s criticism of PM Narendra Modi and BJP on the issue of agriculture law

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.