खासदार उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती स्थिर

खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सोडून उदयनराजे साताऱ्यात परतले होते. दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खासदार उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु, प्रकृती स्थिर
खासदार उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 10:47 PM

सातारा : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजधानी दिल्लीवरुन आल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. (MP UdayanRaje Bhosale’s corona report is positive)

खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे संसदेचं अधिवेशन सोडून उदयनराजे साताऱ्यात परतले होते. दरम्यानच्या काळात उदयनराजे यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील 3 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या लोकांकडून कळतेय.

लॉकडाऊन विरोधात राजेंचं भिक मांगो आंदोलन

दरम्यान, एप्रिल महिन्यात लॉकडाऊन उठवण्याच्या मागणीसाठी उदयनराजे भोसले यांनी भिक मांगो आंदोलन केलं होतं. हाती कटोरा घेत त्यांनी सातारच्या रस्त्यावर भिक मागितली होती. त्यावेळी उदयनराजे तेथील फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते. यावेळी लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम 450 रुपये इतकी होती. हे पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनीऑर्डर करुन उदयनराजे भोसले यांना 450 रुपये परत केले होते.

शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद ठेवायला कोरोना व्हायरस फक्त तेव्हाच बाहेर येतो का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला होता. राज्यभरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा सारख्याच आहेत. माणूस जगण्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळजी घेणे हाच मार्ग आहे. मृत्यूचे प्रमाण पाहता प्रत्येकाला उदंड आयुष्य लाभो, अशा माझ्या सदिच्छा असल्याचे उदयनराजे म्हणाले होते.

पूरग्रस्तांसाठी उदयनराजेंची फेसबुक पोस्ट

आर्थिक, सहाय्याबरोबरच श्रम सहाय्य देखिल पुरविण्याचा आराखडा आम्ही हाती घेतला आहे. शासन कार्यवाहीला पूरक ठरेल असे कार्य हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पूरस्थितीत सापडलेल्यांना आधार देण्याचे काम केले जाईल निसर्गातील पाण्याला पुरेशी वाट मिळाली नाही तर आजुबाजुला पूरपरिस्थिती निर्माण होते. तर मग आपल्या कार्यक्षेत्रातील नद्या, नाले, ओहोळ हे अरुंद झाले आहेत काय याची शोध मोहीम प्रशासनाने हाती घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दशकातील पर्जन्यमान आणि अलिकडच्या काळातील पर्जन्यमान याचा विचार करता, पाऊस पूर्वीपेक्षा कमी-कमी होत आहे. असे असताना अश्या बारंबार घडणा-या घटनांमधुन आपण बोध घेणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.

पूरपरिस्थिती निर्माण होण्याची वास्तववादी कारणे प्रशासनाने जाहिर केली पाहीजेत. वाहुन गेलेले पूल आणि रस्त्यांची कामे कशी झाली होती. त्या त्या वेळी क्वालिटी कंट्रोल टेस्टींग झाले आहे काय, स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे काय इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती सध्याची आपत्कालीन परिस्थिती निवळल्यावर का होईना पण जनतेला द्यावी. पूर येण्याची जर मानवनिर्मित कारणे असतील तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, तत्पूर्वी मदतकार्य वेगाने करावे अन्यथा जनतेचे श्राप-अश्राप सहन होणार नाहीत, असे उदयनराजेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

इतर बातम्या :

वयोवृद्ध महिलेला निद्रानाश, घरात सून-नात असताना बाल्कनीत टोकाचं पाऊल, आत्महत्या की घातपात? नागपुरात खळबळ

वाघ आणि बिबट्याची नखे विकायचे, वन विभागाने सापळा रचला, रंगेहात मुसक्या आवळल्या, वाचा थरार

MP UdayanRaje Bhosale’s corona report is positive

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.