‘त्या’ चार घटना अन् शरद पवारांचे राजकीय डावपेच उघड; अजित पवारांचं 40 मिनिटांचं टोकदार भाषण

Ajit Pawar Speech at MET Bandra : 'त्या' पाच घटना सांगितल्या अन् अजित पवारांनी शरद पवारांच्या राजकीय खेळींचा पाढाच वाचला

'त्या' चार घटना अन् शरद पवारांचे राजकीय डावपेच उघड; अजित पवारांचं 40 मिनिटांचं टोकदार भाषण
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 9:41 AM

मुंबई : तारीख 5 जुलै. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाल्यापासूनचं अजित पवार यांचं सर्वात टोकदार भाषण… . या भाषणानं राष्ट्रवादी पक्ष आणि विशेषत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय खेळींची पोलखोल केली. अजित पवार यांची आपले काका शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. जुन्या घटनांचा दाखला दिला अन् शरद पवार यांना थेट सवाल केले. अजित पवार यांच्या 40 मिनिटांच्या भाषणाने अवघा महाराष्ट्र हादरला….

अजित पवार यांनी केलेले गौप्यस्फोट

1. साल 2014 भाजप-सेना सरकारला राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा

2014 ला जेव्हा देंवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले. तेव्हा राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शपथ विधीला हजर राहण्याचे आम्हाला आदेश देण्यात आले. तेव्हा आम्ही तिथे गेलो. जर त्यांच्यासोबत जायचंच नव्हतं तर मग आम्हाला शपथविधीला का पाठवलं?, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

2. 2017 ला भाजपसोबत खातेवाटपाची चर्चा

2017 वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. जयंत पाटील, सुनील तटकरे आणि मी या बैठकीला होतो. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार होते. आमच्यात चर्चा झाली. मी महाराष्ट्राला कधीही खोटं बोलणार नाही. कोणतं खातं कुणाकडे असेल, कोणतं पालकमंत्रिपद कुणाकडे असेल याची सविस्तर चर्चा झाली. भाजपने शिवसेनेची साथ सोडायला नकार दिला. पण शरद पवारांना शिवसेना सोबत नको होती आणि तिथंच सगळं बारगळलं, असं अजित पवारांनी सांगितलं.

3. 2019 ला सत्तास्थापनेसाठी चर्चा

2019 ला निकाल लागले. तेव्हा एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी बैठक झाली. या बैठकीत ते उद्योगपती शरद पवार, प्रफुल्ल पटेल, मी आणि देवेंद्र फडणवीस आमच्यात चर्चा झाली. त्याच बंगल्यात पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रजींना सांगितलं की कुठे बोलायचं नाही. मग मी कुठे कसा बोलेन. अनेकदा विचारलं जातं की 2019 ला नेमकं काय झालं होतं. पण मी बोललो नाही कारण मला कुणाला बदनाम करायचं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.

4. 2022 एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी राष्ट्रवादी, भाजपमध्ये चर्चा

राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी सह्या करून एक पत्र तयार केलं. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि माझी एक कमिटी केली. आम्हाला सांगतिलं. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की अशा गोष्टी फोनवर बोलून चालणार नाही. तुम्ही इंदौरला या. इंदौरला जाण्याची तिकीटं काढली. पण पवार म्हणाले की तु्म्ही तिकडे गेलात तर मीडियाला कळेल. जाऊ नका. मग आमची तिकीटं कॅन्सल केली. मग म्हणाले की फोनवर बोला पण तोवर एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झालेला नव्हता, असं अजित पवार यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.