विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद, विजय वडेट्टीवार यांची निवड आणि नाराजीच्या चर्चा; पाहा काय म्हणाले अशोक चव्हाण…
Ashok Chavan on Vijay Wadettiwar :२ नितीन देसाई मोठा कलावंत, त्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडाला हवं, मारेकरी समोर यायला पाहिजेत; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य
मुंबई | 02 जुलै 2023 : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विरोधी वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यांचं मनापासूवन अभिनंदन करतो. वडेट्टीवार आपली भूमिका चोख पद्धतीने विधानसभेमध्ये मांडतील. सर्व मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडतील. ते एक अनुभवी नेते आहेत. बऱ्याच पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती योग्यच आहे, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून अशोक चव्हाण आग्रही असल्याची चर्चा होती. तसंच त्यांच्या नाराजीचीही चर्चा होत होती. त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी सांगितलं होतं की मी विरोधी पक्ष नेत्यांसाठी आग्रही नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पडेल. त्यामुळे सत्ताधारी कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा काम करत होते. पण याचा काही फरक पडत नाही. आम्ही सगळे एक आहोत. वडेट्टीवार यांची झालेली निवडीचं आम्ही सगळे स्वागत करतो, असं चव्हाण म्हणाले आहेत.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. अशोक चव्हाण यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनोहर भिडे ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत. ते अत्यंत दुर्दैवी आहे. थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर सरकार कारवाई करत नाही. फक्त नावासाठी गुन्हे दाखल होतात. पण त्यांना अटक होत नाही. ही कुठेतरी लोकशाहीला मारक बाब आहे. पूरक नाहीये आणि त्यामुळे आमचा असं म्हणणं आहे की तातडीने यावर कारवाई व्हायला पाहिजे, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
नितीन देसाई यांनी काल गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यावर बोलताना नितीन देसाई हे मोठे कला दिग्दर्शक होते. त्यांच्या आत्महत्येचं रहस्य उलगडायला हवं. खरे मारेकरी समोर आले पाहिजेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.