सकाळी ठरलं आणि शपथ घेतली असं नाही, सगळं ठरवून झालं; छगन भुजबळांचे मोठे गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal on NCP : कायदेशीर बाबी तपासल्या मगच राष्ट्रवादी भाजपसोबत आली; बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात छगन भुजबळांचे मोठे गौप्यस्फोट

सकाळी ठरलं आणि शपथ घेतली असं नाही, सगळं ठरवून झालं; छगन भुजबळांचे मोठे गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 1:36 PM

मुंबई : अजित पवार यांनी बंड केलं. त्यांनंतर आज अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. सकाळी उठलं विचार केला अन् शपथ घेतली असं होत नाही. आम्ही सगळ्या बाबींचा विचार केला. कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या. मगच राष्ट्रवादी भाजपसोबत आली, असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.

पहाटेचा शपथविधी का झाला, त्यामागचं कारण जनतेला कळलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणालेत. मुंबईतील वांद्र्यातल्या एमईटी मैदानावर अजित पवार गटाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत गेला. मग आम्हीही राष्ट्रवादीसोबत आलो आहोत. आम्हालाही पाठिंबा द्या. शरद पवारसाहेब तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम करू, असं भुजबळ म्हणाले.

अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. बैठकीला सर्व आमदार आले नाही. कारण काही विदेशात आहे, काही आजारी आहेत तर काही वाहतूक कोंडीत अडकलं आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. महिला अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या नाही. वारंवार सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. शरद पवार यांनी सांगूनही काहीही फरक पडत नव्हता.सगळी कामं थांबली होती. सांगूनही काम होत नव्हतं. सर्व समाजाला घेऊन पक्ष जात आहे हे चित्र निर्माण व्हायला हवं होतं ते झालं नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी जयंत पाटलांवर टीकास्त्र डागलंय.

अजित पवार यांनी आमदारांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला 33 आमदार उपस्थित आहेत.

बैठकीला कोण-कोण उपस्थित?

१ अदिती तटकरे २ निलेश लंके ३ सुनील शेळके ४ धर्मराव आत्राम ५ हसन मुश्रीफ ६ रामराजे निंबाळकर ७ धनंजय मुंडे ८ अजित पवार ९ दिलीप वळसे पाटील १० छगन भुजबळ ११ अनिल पाटील १२ नरहरी झिरवळ १३ संजय बनसोडे १४ राजू कारमोरे १५ अण्णा बनसोडे १६ सुनील टिंगरे 17 माणिकराव कोकाटे १८ अनिकेत तटकरे १९ यशवंत माने २० इंद्रनील नाईल २१ बाळासाहेब आकबे २२ राजेश पाटील २३ शेखर निकम २४ नितीन पवार २५ दत्ता भरणे २६ विक्रम काळे २७ संग्राम जगताप २८ मनोहर चंद्रिकापुरे २९ दिलीप मोहिते ३० सरोज आहिर ३१ अमोल मिटकरी ३२ प्रकाश सोळंखे ३३ अतुल बेनके

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.