प्रिय नितीनजी, कठीण प्रसंगांवर लीलया मात करणारे तुम्ही, पण आज…; भाजप नेत्याचं ट्विट चर्चेत
Nitin Desai Death : आयुष्य मोरपंखी, रंग म्हणजे जगणं... रंगात न्हाऊन निघणं म्हणजे आयुष्याचा जलतरंग, तुम्ही तसेच जगलात...; नितीन देसाई यांच्या मृत्यूवर भाजप नेत्याकडून दु:ख व्यक्त
मुंबई | 02 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अकाली जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनीही देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय भावनिक ट्विट केलं आहे. लढवय्ये असणारे तुम्ही, अशी अचानक एक्झिट घ्याल असं कधी वाटलंच नव्हतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट
प्रिय नितीन देसाई,
आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येऊनही त्यावर लीलया मात करणारे तुम्ही, जे करु ते भव्य दिव्यच करु हा ध्यास बाळगणारे तुम्ही … चित्रपटसृष्टीत कर्तृत्वाने मैलाचा दगड ठरलेले तुम्ही, तुमच्या कलासक्तवृत्तीने जग अधिक सुंदर बनविणारे तुम्ही. आयुष्य मोरपंखी आहे. रंग म्हणजे जगणं… आणि रंगात न्हाऊन निघणं म्हणजे आयुष्याचा जलतरंग, असेच म्हणाला होतात तुम्ही. अशी अचानक एक्झिट घ्याल असे कधी वाटलेच नव्हते. खूप वेदना देऊन गेले.
माझी विनम्र श्रद्धांजली!!
प्रिय नितीन देसाई, आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येऊनही त्यावर लीलया मात करणारे तुम्ही, जे करु ते भव्य दिव्यच करु हा ध्यास बाळगणारे तुम्ही … चित्रपटसृष्टीत कर्तृत्वाने मैलाचा दगड ठरलेले तुम्ही, तुमच्या कलासक्तवृत्तीने जग अधिक सुंदर बनविणारे तुम्ही. आयुष्य मोरपंखी आहे. रंग म्हणजे… pic.twitter.com/9unwABH7F4
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 2, 2023
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नितीन गडकरी यांचं ट्विट
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांची ख्याती होती. त्यांचे जाणे ही कला सृष्टीची मोठी हानी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांची ख्याती होती. त्यांचे जाणे ही कला सृष्टीची मोठी हानी आहे. ईश्वर…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 2, 2023
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंकजा मुंडे यांचं ट्विट
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांचे जाणे ही कला सृष्टीची मोठी हानी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !!
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांचे जाणे ही कला सृष्टीची मोठी हानी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !! pic.twitter.com/hBTSf8u2cU
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 2, 2023