Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? असा सवाल मुंबई काँग्रेसने केला आहे. (Mumbai Congress Bhai Jagtap On BMC Election)

काँग्रेसची 'स्वबळा'ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 3:48 PM

मुंबई : येत्या काळात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देशात सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. माझी मुंबई, माझी काँग्रेस हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? असा सवाल मुंबई काँग्रेसने केला आहे. (Mumbai Congress Bhai Jagtap On BMC Election)

“माझी मुंबई, माझी काँग्रेस’‌ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ,” अशी प्रतिक्रिया मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांनी दिली.

“मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकासआघाडीचे सदस्य आहोत. महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते आहे. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकासआघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे 227 जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्या दिवशी सांगितला होता. काल पदभार स्विकारला तेव्हा पुनउल्लेख केला,” असेही ते म्हणाले.

प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

“त्यानुसार आम्ही पुढील 100 दिवसात प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करु, लोकांची काम करु, त्या कार्यकर्त्याला विचारु आणि त्यानंतर वरिष्ठांना 227 जागा का लढायच्या हे सांगू,” असेही जगताप यांनी सांगितले.

“भाजपबरोबर सेना सत्तेत असताना मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकितं करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत‌ नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जात आहे.

काँग्रेस हायकमांडकडून नुकतंच भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.

एकीकडे  शिवसेनेकडून अनेक नेते पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढण्याची भाषा करत आहे. मात्र दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र शिवसेनेच्या या मताशी सहमत नसल्याचं चित्र आहे. यामुळे महाविकासआघाडीतील तिन्ही घटक पक्ष येत्या महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रित की स्वबळावर लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Mumbai Congress Bhai Jagtap On BMC Election)

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.