मुंबई कुणाची ? गायकवाड, जगताप की आणखी कोण ?

भाई जगताप, चरणसिंह सप्रा, सुरेश शेट्टी यांची नावं मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

मुंबई कुणाची ? गायकवाड, जगताप की आणखी कोण ?
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 12:32 PM

नवी दिल्ली : मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे खांदेपालट होणार, की गायकवाडांवरील जबाबदारी कायम राहणार, याची उत्सुकता वाढली आहे. (Mumbai Congress President Eknath Gaikwad likely to get removed)

मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) काल, तर एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आज दिल्लीत आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षपद बदलण्याच्या चर्चांना जोर आला असतानाच या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण?

विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap), माजी आमदार चरणसिंह सप्रा (Charansingh Sapra), माजी मंत्री सुरेश शेट्टी (Suresh Shetti) यांची नावं मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

देवरांच्या राजीनाम्यानंतर गायकवाड

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ गायकवाड यांची वर्ण लागली होती. त्यावेळीही मुंबई काँग्रेसमधील दुफळीची चर्चा रंगली होती.

मराठी चेहरा पुन्हा मिळणार?

मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस मुंबईत पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी पुन्हा मराठी चेहरा मिळणार, की अमराठी नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार, याची उत्सुकता आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतले चेहरे

भाई जगताप – विधान परिषद आमदार. आमदारकीची दुसरी टर्म, भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव (Mumbai Congress President Eknath Gaikwad likely to get removed)

सुरेश शेट्टी – अंधेरी पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार, शेट्टी हे आघाडी सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री. विद्यार्थी चळवळीतून नेतृत्व.

चरणसिंह सप्रा – मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपाध्यक्ष, माजी विधानपरिषद आमदार, मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष (1995-2006)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

काँग्रेस पुन्हा फिरुन तिथेच? राहुल गांधी अध्यक्ष की प्रियंका?

(Mumbai Congress President Eknath Gaikwad likely to get removed)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.