मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका, अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपचा इशारा

मुंबईतील सर्वसामान्य माणसालाही ही मदत मिळाली पाहिजे. राज्यासाठी पॅकेज घोषित करत असताना मुंबईला त्यातून वगळू नका, नाहीतर भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका, अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 7:24 PM

मुंबई : राज्यातील 7 जिल्ह्यात महापुराने थैमान घातलं आहे. तर रायगड, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तत्पूर्वी मुंबईतील काही भागातही भूस्खलन आणि महापुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका. अन्यथा मुंबई भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही ठाकरे सरकारला देत आहोत, असं ट्वीट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. (BJP’s demand for financial help To flood victims in Mumbai)

चिपळूण, सांगली, कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांना सगळे निकष बाजूला ठेवून मदत करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. पण, हे करत असताना मुंबईला यात विसरु नका, वगळू नका, एवढीच भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. कारण मुंबईमध्येही पाणी अफाट भरलं, 26 जुलैसारखं भरलं. चाळकरी, झोपडपट्टीधारक, त्या ठिकाणचे व्यापारी, मध्यमवर्गीय, यांचं लाखो नाही तर कोट्यवधी रुपयांचं नुकसान या पावसामुळे झालं आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य माणसालाही ही मदत मिळाली पाहिजे. राज्यासाठी पॅकेज घोषित करत असताना मुंबईला त्यातून वगळू नका, नाहीतर भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

घर-दुकानात पाणी शिरलेल्यांना 10 हजार, अन्नधान्यासाठी 5 हजार

चिपळूण, महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. सांगली आणि कोल्हापुरात अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेलं आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची घोषणा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून काल 6 जिल्ह्यांमध्ये पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात भिंत उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक

मुंबई उपनगरातील आपत्ती रोखण्यासाठीच्या उपायांचा आदित्य ठाकरेकडून आढावा, पर्याय सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

BJP’s demand for financial help To flood victims in Mumbai

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.