India Alliance Mumbai Meeting : ‘इंडिया’च्या नेत्यांचं फोटोसेशन सुरु असताना अचानक ‘या’ बड्या नेता हजेरी

Mumbai India Alliance Meeting : राहुल गांधी, शरद पवार, लालू प्रसाद यादव ग्रँड हयातमध्ये पोहोचले; 'इंडिया'च्या नेत्यांचं फोटोसेशन सुरु असताना अचानक 'या' बड्या नेता हजेरी, 'इंडिया'च्या बैठकीत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

India Alliance Mumbai Meeting : 'इंडिया'च्या नेत्यांचं फोटोसेशन सुरु असताना अचानक 'या' बड्या नेता हजेरी
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 11:59 AM

मुंबई | 01 ऑगस्ट 2023 : देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते हॉटेल ग्रँड हयातमध्ये पोहोचले आहे. या बैठकीवेळी अचानकपणे एका बड्या नेत्याची एन्ट्री झाली. या नेत्याच्या येण्याने या बैठकीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. देशाच्या राजकारणाची जाण असलेले वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या बैठकीत हजेरी लावली. काही दिवसांआधी कपिल सिब्बल हे काँग्रसमधून बाहेर पडले आहेत. आता त्यांनी अशी अचानकपणे लावलेली हजेरी चर्चेत आली आहे.

काँग्रेसमधून बाहेर जाताना कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवरही टीका केली होती. अशात आता इंडियाच्या बैठकीत ते अचानकपणे आल्याने उपस्थितांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. इंडिया आघाडीची दोन दिवस बैठक होतेय. काल आणि आज ही बैठक आयोजित आहे. अशात देशातील महत्वाचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या नेत्यांनी काहीवेळा आधी एकत्रित फोटो सेशन केलं. या फोटो सेशनवेळी कपिल सिब्बल आल्याने एकच सुरु चर्चा झाली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याशी बोलत कपिल सिब्बल यांनी या बैठकीत एन्ट्री केली. फारूख अब्दुल्ला यांनी कपिल सिब्बल यांना या बैठकीत बोलावल्याची माहिती आहे.

शरद पवार इंडिया आघाडीचे संयोजक?

इंडिया आघाडीच्या संयोजकपदी कोण असेल? अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून होतेय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. पण इंडियाच्या या बैठकीतील आसन व्यवस्थेमुळे शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण शरद पवारांना बैठकीच्या मध्यभागील खुर्चीवर स्थान देण्यात आलंय. सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंना पवारांच्या बाजूची खुर्ची देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार इंडिया आघाडीचे संयोजक होणार का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.