Mumbai International Airport : छत्रपतींचे नाव बदलून अदानींचं नाव देणं ही सर्वात मोठी चूक, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली. परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावं.

Mumbai International Airport : छत्रपतींचे नाव बदलून अदानींचं नाव देणं ही सर्वात मोठी चूक, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 7:58 PM

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर उभारण्यात आलेला हा बोर्ड शिवसैनिकांनी आज फोडला आहे. त्यावरुन आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून अदानी विमानतळ करणं योग्य नाही, ही अदानींची सर्वात मोठी चूक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. (Shivsena Party Workers smashed board of Adani Company, Nawab Malik criticizes Adani group )

जीव्हीके एअरपोर्टकडून अदानीने सर्व मालकी आणि शेअर्स खरेदी केल्यानंतर विमानतळाची मालकी अदानींकडे गेली. परंतु याचा अर्थ हा नाही की छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव बदलून अदानी एअरपोर्ट करावं. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा अधिकार आहे. मात्र, नाव बदलण्याचा किंवा नाव ठेवण्याचा अधिकार नाही, असंही नवाब मलिक म्हणाले. अदानी एअरपोर्ट लिहिणे हे योग्य नाही. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तशी घटना त्याठिकाणी घडली आहे. अदानीने लोकांची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.

MPSCचा विषय राज्यपालांकडे – नवाब मलिक

एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यसरकारने अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. राज्यपाल त्यावर लवकरात लवकर हस्ताक्षर करतील अशी अपेक्षाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान MPSCच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय राज्यपालांकडे प्रलंबित आहे, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय.

31 जुलैच्या तीन दिवस अगोदर राज्यसरकारने तीन नावे निश्चित करून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यावर राज्यपाल हस्ताक्षर करतील आणि प्रस्ताव परत शासनाकडे पाठवला जाईल. तसंच त्या नियुक्त्या होऊन एमपीएससीचे कामकाज सुरू होईल. मात्र, निर्णय लवकर होणं अपेक्षित आहे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

रिक्त पदे भरण्यासाठी ‘वाझे ‘ हवेत का?, भाजपचा सवाल

राज्य लोकसेवा आयोगाच्या 4 रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजित पवार यांनी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

Video : शिवसैनिकांनी ‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड फोडला, आता अदानी कंपनीकडून स्पष्टीकरण!

Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड

Shivsena Party Workers smashed board of Adani Company, Nawab Malik criticizes Adani group

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.