जयंत पाटील-जितेंद्र आव्हाड अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा; आव्हाड म्हणाले, हा तर माझा अपमान…

Jitendra Awhad on Ajit Pawar Group : जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा; आर. आर. पाटील यांचे कुटुंब कुणासोबत? शरद पवार की अजित पवार? पाहा...

जयंत पाटील-जितेंद्र आव्हाड अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा; आव्हाड म्हणाले, हा तर माझा अपमान...
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 9:29 AM

मुंबई | 08 ऑगस्ट 2023 : केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं. अमित शाह दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा रंगली. शिवाय जयंत पाटील लवकरच अजित पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. शिवाय जयंत पाटलांसोबत जितेंद्र आव्हाड यांचंही नाव चर्चेत आहे.

जितेंद्र आव्हाड हेदेखील अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर आव्हाडांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली.

तुमचंदेखील नाव चर्चेत आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हीदेखील अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं बोललं आहे, त्यावर आव्हाडांनी माझं नाव चर्चेत असूच शकत नाही. मी कायम शरद पवार साहेबांसोबतच आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

माझ्याबद्दल अशी चर्चा होणं हाच माझा मोठा अपमान आहे, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

मला केवळ एवढंच म्हणायचे की, कुणीतरी जाणून-बुजून या सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करतंय. काही ब्लॉगर्स आहेत. ज्यांच्याकडून जयंत पाटील आणि माझ्याविषयी या सगळ्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय. ते त्याचा असुरी आनंद सुद्धा घेत आहेत. पण मी शंभर टक्के सांगतो की आम्ही राष्ट्रवादी सोडणार नाही, असं आव्हाड म्हणाले.

जयंत पाटील असू द्या किंवा मी स्वतः असू द्या मी शरद पवारांसोबतच राहील. मरेपर्यंत मी शरद पवार यांच्या सोबतच राहील, असं आव्हाडांनी सांगितलं.

सरकारकडून चुकीच्या पद्धतीने हे सगळं पेरलं जातं आहे, आम्हाला वाटतं. आता संभाजी भिडे यांचं प्रकरण आहे.संभाजी भिडे यांची लायकी आहे का? संभाजी भिडे हा भ#X@ आहे. त्याला महात्मा फुलेंच्या नखाची तरी सर आहे का? तो विकृत आहे विकृत आणि अशा विकृत लोकांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असं मला वाटतं, अस आव्हाडांनी म्हटलं.

आर. आर. पाटील यांचं कुटुंब कुणासोबत?

आर. आर. पाटील यांचे कुटुंब शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार आहे, असं रोहित पाटील आणि आमदार सुमन पाटील यांनी सांगितलं आहे. सुमन पाटील यांनी जयंत पाटलांसोबत अमित शहांची भेट घेतल्याची बातमी एक अफवा आहे. आम्हाला सुध्दा प्रसारमाध्यमातूनच ही माहिती मिळाली होती. आबा कुटुंबाची भूमिका अजितदादा पवार यांनी बंड केले त्यावेळी स्पष्ट केली आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे.

छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.