खातेवाटपासंदर्भातील मोठी बातमी; अजित पवार गटाला ‘ही’ दोन खाती मिळणार, सूत्रांची माहिती

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठी बातमी; अजित पवार गटाला ही दोन खाती मिळणार, सूत्रांची माहिती. 'या' खात्याला भाजपचा विरोध नाही. मात्र शिंदेगट आक्रमक

खातेवाटपासंदर्भातील मोठी बातमी; अजित पवार गटाला 'ही' दोन खाती मिळणार, सूत्रांची माहिती
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 12:08 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात घडामोडी घडत आहेत. अशातच आता खातेवाटपासंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाला दोन मोठी खाती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थखातं अजित पवार गटाकडे राहील, अशी माहिती आहे. तसंच राज्याचं महसूल खातंही अजित पवार यांच्याच कडे जाणार असल्याची माहिती आहे.

अर्थखातं आपल्याकडे राहावं अशी आग्रही भूमिका अजित पवार यांची आहे. तसा प्रस्ताव त्यांनी भाजपसमोरही मांडला. भाजपला तो मान्य असल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा अर्थ खातं अजित पवार यांना देण्यास कडाडून विरोध आहे.

अजित पवार यांना अर्थखातं देण्यास भाजपचा विरोध नाही, अशी सध्या माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला या संदर्भात समजावून सांगण्याची मागणी अजित पवार यांनी अमित शाहांकडे केल्याची माहिती आहे. आता या संदर्भात अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या,सोबत चर्चा करणार असल्याचं कळतं आहे.

अजित पवार गटाची आज बैठक

आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार गटाची बैठक होणार आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर आज अजित पवार पक्षातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. बैठकीत काय चर्चा झाली यावर अजित पवार वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. खातेवाटपात कोणतीही अडचण येणार नाही. कालच्या दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीत मार्ग निघाला असावा, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विविध घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादीत धुसफूस वाढली आहे. मंत्रिपद मिळत नसल्याने तीन आमदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. माणिकराव कोकाटे, अतुल बेनके आणि किरण लहामटे या तीन आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. हे तिघे वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर

पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिनेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.