महापौर आणि काँग्रेस नेते एकाच मंचावर, पेडणेकर म्हणाल्या, एकत्र राहू, काँग्रेसचं रोखठोक उत्तर
आजच्या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने भाष्य केलं. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे , तर चांगलं होईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई : “मुंबई आणि महाराष्ट्रसाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे”, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी काँग्रेसला (Congress) सोबत राहण्याचं आवाहन केलं. मात्र आम्ही स्वबळावरच लढणार, असं काँग्रेसने ठणकावून सांगितलं. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar appeals congress for alliance but Ravi Raja said we will fight own BMC Election)
मुंबईतील शीव इथे एका कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेसने केलं होतं. विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप एकत्र होते. शिवसेना आणि काँग्रेसचे महापालिकेतील नेते एकत्र, एकाच मंचावर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा काँग्रेसने वारंवार केली आहे.
याबाबत आजच्या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने भाष्य केलं. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे , तर चांगलं होईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
काँग्रेस स्वबळावर ठाम
किशोरी पेडणेकर यांनी एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर, लगेचच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नकार दिला. आम्ही स्वबळावरच लढणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
@mybmc @mybmcWardFN 176 विरोधी पक्ष नेता श्री रवी राजा यांच्या प्रयत्नाने “लॅपटॉप व टॅब वितरण सोहळा” शुभहस्ते- @KishoriPednekar महापौर मुंबई@VarshaEGaikwad शिक्षण मंत्री@BhaiJagtap1 @INCMumbai अध्यक्ष पुष्पा कोळी नियाज वणू श्री बेल्लाळे सर@AUThackeray @OfficeofUT @ShivSena pic.twitter.com/wQyCgDfn3Y
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) July 17, 2021
महापालिकेत काँग्रेस आक्रमक
राज्यात शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेत मात्र या दोन्ही पक्षात विस्तवही जात नाही. संधी मिळताच महापालिकेत शिवसेनेला अडचणीत आणायचं असं धोरण काँग्रेसने घेतलेलं दिसतंय. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या नालेसफाईच्या या आकडेवारीचा पर्दाफाश करणार असल्याचंही रवी राजा यांनी स्पष्ट केलं होतं.
मुंबई महापालिकेने मुंबई शहरात 102 टक्के, पूर्व उपनगरात 93 टक्के तर पश्चिम उपनगर 96 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. त्यावर रवी राजा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
संबंधित बातम्या
मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेस वाद शिगेला! कशी होणार महाआघाडी?
मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार; आता विरोधी पक्षनेते रवी राजांचाही नारा
मुंबई महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी; काँग्रेस आणणार शिवसेनेला अडचणीत