महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, पवारांनाही भेटणार

जर बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरप्रसंगी राज ठाकरे उपस्थित राहिले तर उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर येतील 

महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची भेट, पवारांनाही भेटणार
किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट घेतली
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 11:46 AM

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray)यांची भेट घेतली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. (Mumbai mayor kishori pednekar Meet Devendra fadanvis And Raj thackeray)

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तथा निमंत्रण देण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेतली. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार सर्वांना निमंत्रण देत आहे. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस, राज ठाकरे आणि आता शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं महापौर पेडणेकर म्हणाल्या. पुतळा बसवण्यात थोडा उशीर झाला. अनेक परवानग्या रखडल्या होत्या. आज बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातून पुतळ्याचं अनावरण होतंय हा योगायोग आहे”, असंही महापौर पेडणेकर म्हणाल्या.

….तर मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र!

नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नाहीत. आता जर बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरप्रसंगी राज ठाकरे उपस्थित राहिले तर उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर येतील.

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

(Mumbai mayor kishori pednekar Meet Devendra fadanvis And Raj thackeray)

हे ही वाचा

भाजपचे दावे खोटे, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ : नवाब मलिक

महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.